ETV Bharat / state

परवानगी शिवाय नंदीध्वजाची पूजा, सिद्धेश्वर मंदिरात असंतोष - सिद्धेश्वर यात्रा नंदीध्वजावरुन वाद

नऊशे वर्षांपासूनची सिद्धेश्वर यात्रेची परंपरा यावर्षी कोरोनामुळे शासन परवानगीनेच काढावी लागणार आहे. मात्र अद्याप शासनाची परवानगी मिळाली नसतानाही जगदीश पाटील यांनी राहत्या घरासमोर नंदीध्वज उभारून पत्नीसह पूजा केली. त्यामुळे सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू जगदीश पाटील यांच्या घरासमोर दाखल झाले आणि संताप व्यक्त केला.

nandidhwaj pooja in solapur
सिद्धेश्वर यात्रा नंदीध्वजावरुन वाद
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:17 AM IST

Updated : Dec 29, 2020, 1:24 PM IST

सोलापूर - प्रशासनाच्या परवानगी विना नंदीध्वज उभारल्याने सोलापूरात वाद उसळला आहे. नऊशे वर्षांपासूनची सिद्धेश्वर यात्रेची परंपरा यावर्षी कोरोनामुळे शासन परवानगीनेच काढावी लागणार आहे. सिद्धेश्वर यात्रा सुरु होण्यापूर्वी नंदीध्वज मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र अद्याप शासनाची परवानगी मिळाली नसतानाही जगदीश पाटील यांनी राहत्या घरासमोर नंदीध्वज उभारून पत्नीसह पूजा केली. त्यामुळे सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू हे जगदीश पाटील यांच्या घरासमोर दाखल झाले आणि संताप व्यक्त केला. जगदीश पाटील आणि राजशेखर हिरेहब्बू यांच्यात खडाजंगी झाली.

परवानगी विनाच नंदीध्वजाची पूजा
जगदीश पाटील यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास पत्नीसह नंदी ध्वजाची पूजा केली. प्रशासनाने सिद्धेश्वर महायात्रेच्या कोणत्याही धार्मिक विधीला परवानगी दिली नाही. सिद्धेश्वर मंदिराचे पदाधिकारी आणि राजकीय नेते आमदार आदी महायात्रेच्या परवानगीसाठी प्रयत्न करत आहेत. पण जगदीश पाटील यांनी अचानक नंदीध्वज पूजा केल्याने प्रशासन कडक निर्णय घेईल आणि प्रशासनासोबत होत असलेल्या बैठका निष्फळ होतील.

सिद्धेश्वर यात्रा नंदीध्वजावरुन वाद

सिद्धेश्वर भक्तांच्या मनात प्रशासना विरोधात खदखदकोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीला अनेक नियमावली आल्या आहेत. दरवर्षी सिद्धेश्वर महायात्रा संपन्न होण्या अगोदर एक महिन्याआधीपासून काठी सराव किंवा नंदीध्वज सराव केला जातो. यंदा या सरावाला देखील प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर भक्तांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. जगदीश पाटील यांनी अचानक काठी किंवा नंदीध्वजाची पूजा करून एक ठिणगी फेकण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सोलापूर शहरात सिद्धेश्वर भक्तांत काठी उठाव किंवा नंदीदध्वज उठाव होण्याची शक्यता झाली आहे.

मंदिराचे मुख्य पूजारी हिरेहब्बू आणि जगदीश पाटलांमध्ये हमरीतुमरी

बाळीवेस येथील राहत्या घरासमोर जगदीश पाटील यांनी सोमवारी रात्री नंदीध्वजाची पूजा केली. ही बाब माहीत होताच सिद्धेश्वर मंदिराचे मुख्य पूजारी राजशेखर हिरेहब्बू दाखल झाले. भक्तांची दिशाभूल करू नका, आम्हाला प्रशासनाची परवानगी घेऊनच विधी पार पाडायचे आहेत. कोणाची परवानगी घेऊन ही स्टंटबाजी करत आहे. असे प्रश्न विचारताच दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. एकमेकांना कन्नड भाषेत अर्वाच्य भाषेत बोलू लागले.

एकीकडे राजकीय श्रेय घेण्याची स्पर्धा तर दुसरीकडे भक्तांच्या स्पर्धा

एकीकडे आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे सिद्धेश्वर महायात्रेला परवानगी प्राप्त करण्यासाठी धडपड करत आहेत. श्रेयवादाची लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे भक्तांमध्ये देखील स्पर्धा सुरू झाल्या आहेत. तर मंदिराचे पुजारी राजशेखर हिरेहब्बू देखील आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी लढत आहेत.

Last Updated : Dec 29, 2020, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.