ETV Bharat / state

'विठ्ठला'च्या दारी पुन्हा संचारबंदी; कार्तिकी वारी निमित्ताने घेतला निर्णय

आषाढी वारी कालावधीत ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी केली होती, त्याचप्रमाणे कार्तिकी वारीलाही जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर आणि पंढरपूर शहर स्तरावर नाकाबंदी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

again lockdown in pandharpur
'विठ्ठला'च्या दारी पुन्हा संचारबंदी
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:28 PM IST

Updated : Nov 21, 2020, 7:14 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - कार्तिकी वारीनिमित्ताने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये 24 नोव्हेंबर ते ते 26 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी असणार आहे. आषाढी वारी कालावधीत ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तीन स्तरावर नाकाबंदी केली होती, त्याचप्रमाणे कार्तिकी वारीलाही जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर आणि पंढरपूर शहर स्तरावर नाकाबंदी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. तर याबाबत पोलीस प्रशासनाकडून जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याबाबत माहिती देताना.

एसटी सेवे बाबत संभ्रम

पंढरपूरकडे येणाऱ्या आणि पंढरपूरवरून जाणाऱ्या एसटी बससेवाही 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या तरी बससेवा सुरूच रहाणार असल्याचे सांगितले. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता संबधित विभागाने बस सेवा बंद ठेवण्या बाबत निर्णय घ्या तसा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कालावधीत बस सेवा सुरू रहाणार की नाही या बाबत संभ्रम आहे.

कार्तिक वाढीसाठी अठराशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीवारीच्या नियोजना प्रमाणेच कार्तिक वारीचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूरमध्ये सुरक्षिततेसाठी सुमारे 1800 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. शासकीय निवासस्थान येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरेकेडिंग करून घ्यावे तसेच मंदिर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंडिंग करावे, वारी कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचेही अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.

पालखी व दिंड्यानाही पंढरपुरात प्रवेश बंदी -

यंदा कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत. कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे. कार्तिकी यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्त संख्येने वारकरी भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने गर्दी झाल्यास फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करता येणार नाही. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये सहा फूटांचे अंतर ठवायचे झाल्यास दर्शन रांग 25 किलोमीटरहून अधिक लांब जाईल. यामुळे पोलीस, आरोग्य आणि अन्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शासनाकडे यंदाची वारी प्रतिकात्मक असावी, असा प्रस्ताव पाठवला होता. त्याची दखल शासनाने घेतली आहे.

पंढरपुरातील मठांमध्ये परगावातील व्यक्तीला राहण्याची परवानगी देऊ नये -

कार्तिक वारीनिमित्त दिंडी आणि पालखी यांना पंढरपुरमध्ये येण्यास बंदी घातली आहे. पंढरपुरातील मठ आणि संस्थानिकांच्या प्रमुखांची पोलीस प्रशासनाकडून बैठक होणार आहे. त्यामध्ये संस्था किंवा मठामध्ये वारकरी आणि भाविकांना प्रवेश देऊ नये, संस्थेत किंवा मठामध्ये पर गावातील व्यक्तीला राहण्याची परवानगी देऊ नये, संस्थेतील किंवा मठामध्ये राहत असणारे त्यांनाच राहण्याची परवानगी द्यावी, महाराज मंडळींनी आषाढीप्रमाणे कार्तिकी वारीलात प्रशासनाला सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुला-फळांची आरास

Last Updated : Nov 21, 2020, 7:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.