ETV Bharat / state

Pandharpur Maghi Wari : टाळ मृदूंगाच्या गजरात दुमदुमली पंढरपूर नगरी.. दोन वर्षानंतर चंद्रभागा नदीपात्रात भाविकांची मांदियाळी

कोरोनामुळे गेली दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपुरात माघी वारी ( Pandharpur Maghi Wari ) होऊ शकली नाही. आज मात्र वारीला परवानगी दिल्याने टाळ मृदूंगाच्या गजरात पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे. दोन वर्षानंतर चंद्रभागा नदीपात्रात भाविकांची मांदियाळी जमली ( Chandrabhaga river basin is full of devotees ) होती.

पंढरपुरात भाविकांची गर्दी
पंढरपुरात भाविकांची गर्दी
author img

By

Published : Feb 12, 2022, 10:12 PM IST

पंढरपूर : गेल्या दोन वर्षापासून सुनीसुनी वाटणारी चंद्रभागा आज भाविकांच्या जय घोषामुळे फुलून गेल्याचे चित्र दिसून ( Chandrabhaga river basin is full of devotees ) आले. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून चार वारीतील महत्त्वपूर्ण वारी असणारी माघी वारी भरू शकली ( Pandharpur Maghi Wari ) नव्हती. विठुराया नगरीत शनिवारी सुमारे तीन लाख भाविकांनी जया एकादशी निमित्ताने विठुराया दरबारी हजेरी लावली. यावेळी विठ्ठल मंदिर परिसर टाळमृदुंगाच्या गजरामध्ये दणाणून सोडला होता.

टाळ मृदूंगाच्या गजरात दुमदुमली पंढरपूर नगरी.. दोन वर्षानंतर चंद्रभागा नदी पात्रात भाविकांची मांदियाळी

नियमांचे पालन करत परवानगी

दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाचा विचार करून राज्य सरकारने माघी वारी संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपात साजरी केली होती. परंतु यंदा माघी वारीसाठी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची निर्बंध न लागता विठूरायाची माघी वारी कोरोना नियमांचे पालन करत करण्याची परवानगी दिली होती. विठुरायाच्या मुखदर्शनासाठी विठ्ठल मंदिरापासून पाच किलोमीटरची रांग लागली होती. त्यामुळे मुक्त दर्शनाच्या रांगेत लाखो भाविक गेल्या रात्रीपासून उभे असल्याचे चित्र दिसून आले. विठुरायाच्या भेटीची आस असणाऱ्या वारकऱ्यांनी मुख दर्शनावर समाधान मानले.

नामदेव पायरीवर अलोट गर्दी

विठ्ठलाची महापूजा विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य भगरे गुरुजी यांनी सपत्नीक पहाटेच्या सुमारास केली. त्याच वेळी विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी येथे भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यामध्ये पोलीस प्रशासनाकडून सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर नगरपरिषद प्रशासनाकडून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आल्या होत्या. सुमारे तीन लाख भाविकांनी भाविक सहभागी झाल्याचे दिसून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.