ETV Bharat / state

House On Fire In Solapur : पत्नीशी भांडण झाल्यानंतर पेटवले स्वत:चे घर; शेजाऱ्यांची पोलिसांत धाव - husband set the house on fire In Solapur

पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वत:च्या घराला पतीने आग लावली. ही घटना सोलापूरमध्ये नक्का वस्ती येथे घडली आहे. (Husband Set The house On Fire In Solapur) आगीत घरातील फ्रीज, कपाट व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या आगीत शेजारच्या घरांना देखील आगीची झळ बसली आहे.

घराला आगीने वेढा घातला
घराला आगीने वेढा घातला
author img

By

Published : Mar 22, 2022, 12:39 PM IST

सोलापूर - सोलापुरातील पूर्व भागातील, नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वत:च्या घराला पतीने आग लावली. (House On Fire In Solapur) आगीत घरातील फ्रीज, कपाट व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या आगीत शेजारच्या घरांना देखील आगीची झळ बसली आहे.

माहिती देताना शेजारी

घरगुती वादातून पत्नीला हाकलून दिले-

शामसुंदर अंबाजी भंडारी (रा. नक्का वस्ती) याने रविवारी पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. घरातील टीव्ही फोडून इतर साहित्यांचे नुकसान केले होते. (Husband Set The house On Fire In Solapur) पत्नी मुलासह घरातून गेल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना स्वतःचे घर पेटवणार असल्याची धमकी दिली होती. सोमवारी तो सायंकाळी घरी आला. नळाला पाणी सुटले होते. स्वतःच्या घरातील सिंटेक्स पाण्याची टाकी भरली. त्यानंतर शामसुंदर भंडारी घरातून निघून गेला, थोड्याच वेळेत घरातून धूर येऊ लागले. बघता बघता आग मोठ्या प्रमाणात पेटली.

शेजारच्या लोकांनी आरोप केले

आजुबाजूच्या स्थानिक लोकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दोन गाड्या पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आणि आग विझवण्यात आली. यामध्ये सुमारे दोन लाख रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.

शामसुंदर भंडारी याने पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले होते

घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग भडकल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच पतीपत्नीचे दोन दिवसांपासून भांडण होत होते. शामसुंदर भंडारी याने पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले होते. ही आग शामसुंदर यानेच लावली आहे असा आरोप शेजारच्या लोकांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनाम केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पतीनेच लावली आग याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही-

पती-पत्नीच्या घरगुती वादातून पती शामसुंदर भंडारी यानेच ही आग लावली आहे असा शेजारच्या लोकांनी आरोप केला आहे. मात्र, पोलीस याचा तपास करत आहेत. पोलिसांनी किंवा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी याला अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. तपासानंतर खरी माहिती समोर येईल अशी भूमीक पोलिसांनी घेतली आहे.

हेही वाचा - Nana Patole : पाच राज्यांच्या निवडणुका नंतर महागाईचा भडका होणारच होता - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.