सोलापूर - शेतकरी नेत्यांमधील वाद आता चांगलाच पेटला आहे. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वाभिमनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पढरपुरातील चंद्रभागेच्या पत्रात जलसमाधी दिली.
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्यांचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. माढा तालूक्यात सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्या दहन करण्यात आले होता. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चंद्रभागेत समाधी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूरयेथे चंद्रभागेत जलसमाधी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालूका अध्यक्ष सचिन पाटील, रायाप्पा हळणवर,अमर इगळे, शहजान शेख, नानासाहेब चव्हाण, शिवाजी सावंत, संतोष शिंदे,आबासाहेब शिंदे, सौरभ बागल उपस्थित होते.