सोलापूर - बार्शी तालुक्यातील खांडवी गावाजवळ लक्झरी बस व बोलेरो पिकपचा भीषण अपघात झाला आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. अपघातामध्ये बोलेरो पिकप वाहनांमधील एक बैल व एक गाय जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत.
हेही वाचा - वाडा-मनोर महामार्गावर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच 45 एएफ 2296) या वाहनाचे दोन तुकडे झाले आहेत. तसेच लक्झरी बस (क्रमांक एम एच 11 सीएच 9576) यातील जखमी व्यक्तींना बार्शी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटनास्थळी बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास बार्शी तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - औषधाने मुले होत असल्याचे सांगून 3 लाखांचा गंडा ; बोगस डॉक्टरसह तीनजण अटकेत