ETV Bharat / state

Ashadhi Ekadashi 2023: मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारल्याने माकप कार्यकर्ते शांत, ताफा अडविण्याची होती पूर्ण तयारी

author img

By

Published : Jun 28, 2023, 7:59 PM IST

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री यांना सोलापूर विमानतळ येथे नागरी मुलभूत समस्यांबाबत निवेदन दिले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विमानतळवरच नरसय्या आडम यांचे निवेदन स्वीकारले आहे.

Soalpur News
मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले
माहिती देताना नरसय्या आडम

सोलापूर : एकादशी निमित्त मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी 29 जूनच्या पहाटे मंदिरात जाणार आहेत. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर-सोलापूर दौरादरम्यान, दिव्यांग, सेवानिवृत्त सोमपा परिवहन कर्मचारी, गोदूताई परुळेकर नगर येथील नागरी मुलभूत समस्यांबाबत ज्येष्ठनेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने सोलापूर विमानतळाबाजूला येऊन बसले होते. मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्यांचा ताफा अडविणार अशी त्यांची भूमिका होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळवरच नरसय्या आडम यांचे निवेदन स्वीकारल्याने ताफा अडविण्याचा निर्णय बदलला.

ताफा अडविणार असल्याने पोलिसांची धाकधूक : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली माकपच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी बुधवारी दुपारी टोकाची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळवरच नरसय्या आडम यांचे निवेदन स्वीकारल्याने ताफा अडविण्याचा निर्णय बदलला. एकनाथ शिंदे हे आषाढी वारीसाठी जाताना बुधवारी दुपारी सोलापूर विमानतळवर आले होते. सोलापूर ते पंढरपूर असा प्रवास करत गेले. सोलापूर ते पंढरपूर बायरोड जाणार असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त होताच, सोलापूर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा शहरात तैनात केला होता. माकपचे कार्यकर्ते ताफा अडविणार असल्याने पोलिसांनी सावध भूमिका घेत, अधिकचा बंदोबस्त वाढविला होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवतील अशी शंका गुप्तचर पोलिसांनी व्यक्त केल्याने शहर पोलिसांची धाकधूक वाढली होती.

माकपचे कार्यकर्ते ताफा अडविणार होते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माकपचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सोलापुरातील दिव्यांग बांधव समस्या, सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती वेतन मागणी, महिला विडी कामगार, सहकारी गृहनिर्माण गोदूताई विडी घरकुल या संस्थेतील अंतर्गत रस्ते व मूलभूत समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नसते तर, आमचे कार्यकर्ते हे ताफा अडविणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले, तसेच त्यांनी आश्वासन दिले. माकप नेते आडम मास्तर यांनी मुख्यमंत्र्यांना एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे.

मोठ्या संख्येने विमानतळाबाजूला गर्दी होती : सोलापूर विमानतळ शेजारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख, युसुफ शेख, विल्यम ससाणे, अनिल वासम, सनी शेट्टी, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापु साबळे, अप्पाशा चांगले, रफीक काझी, दत्ता चव्हाण, शामसुंदर आडम, नरेश गुल्लापली, गोविंद सज्जन, बालाजी तुम्मा, राजेंद्र गेंट्याल, राकेश म्हेत्रे, मधुकर चिल्लाळ, महीबुब मनियार, सद्दाम बागवान, नागनाथ जल्ला, डेव्हिड शेट्टी, कुरमेश म्हेत्रे, प्रभाकर गेंट्याल, अकील शेख, योगेश अकीम, चंटी बिटला, चंद्रकांत गोन्याल, श्रीकांत, शब्बीर नारूकोट, मशाक बागवान, श्रीनिवास गोन्याल, राहुल बुगले, कुमार येलगेटी, नितीन माकम, मोहसीन शेख, प्रकाश जगले, इमाम शेख, बाळु म्हेत्रे, सौडप्पा पेद्दी, हणमंत पेद्दी, वसीम देशमुख, मल्लेशम कारामपुरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Bandu Jadhav Criticized on CM: आषाढी वारीत वारकऱ्यांचे हाल अन् सरकार मात्र जाहिरातीत मग्न- खासदार संजय उर्फ बंडू जाधव
  2. Eknath Shinde Pandharpur Visit : केसीआर यांच्या दौऱ्याआधीच मुख्यमंत्री पंढरपुरात; कामात कमतरता राहिल्यास अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.