पंढरपूर (सोलापूर) - 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असतो. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून काही निसर्गप्रेमी व मंडळी निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करतात. मात्र, एका दिवसांनी वृक्ष लागवड केल्याने प्रदूषणात घट होते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पंढरपूर शहरातील एकाने निसर्गाच्या प्रेमासाठी आतापर्यंत तीन लाख बीज गोळे व 12 हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. पंढरपूर शहरात राहणाऱ्या आनंद नगरकर यांनी गेल्या 13 वर्षांपासून निसर्गाच्या वृक्षसंपदाला वाढविण्याचे काम केले आहे.
रोपे तयार करणारा अवलिया
अनंत नगरकर यांनी विविध रोपांचे बीज गोळे तयार करून बीज गोळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीवर टाकण्याचे काम करतात. त्यामुळे आशा बीज गोळ्यामधून आपोआपच राई निर्माण होत असते. त्यामुळे कोणत्याही रोपाला पालन पोषणाची गरज पडत नाही. ते राई निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याचे रूपांतर रोपांमध्ये होते. त्यामुळे रोपे करणारा अवलिया म्हणून नगरकर यांच्याकडे पाहिले जाते.
छोट्या-छोट्या माध्यमातून राईपासून रोपांची निर्मिती
सुमारे 13 वर्षांपूर्वी आनंद नगरकर यांनी रोपांची निर्मिती करण्याची सुरुवात केली होती. नागरिकांना नुसते रोपे वाटण्यापेक्षा त्याचे बीज गोळे तयार करणे हे सोपे काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रथम त्यांनी तुळशी वृंदावनाचे आठ रोपे वाटून आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी आंबा, चिंच, जांभूळ, पेरू, सीताफळ, रामफळ, शेवगा, चिकू, शेवरी या रोपांची आतापर्यंत सुमारे तीन लाख बीज गोळे तयार केले आहेत. ते गेली तेरा वर्षे अवैधपणे निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी पार पाडत आहे.
वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून बीज गोळ्यांचे वाटप
श्री विठ्ठलाची शेकडो वर्षांची वारीची परंपरा आहे. यामध्ये प्रामुख्याने पंढरपुरात चार वाऱ्या भरत असतात. त्यातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. अशा वारकऱ्यांना पंढरपुरातून गावी परत जात असताना आनंद नगरकर यांच्याकडून बीज गोळ्यांचे वाटप करण्यात येते. त्यातूनच राज्यातील तसेच परराज्यातील वारकरी भाविकांकडून बीज गोळे विविध प्रांतापर्यंत पोहोचण्याचे काम करतात. बीज गोळे हे बिस्कीट किंवा साबणाच्या बॉक्स मधूनही तयार करण्यात येते. त्यामुळे सोबत नेताना प्रवाशांना मदत होत असे.
वृक्षसंपदेवर शेकडो व्याख्यान माला
ग्रामीण भागातील शाळा, दिंड्यामधील वारकरी भक्त, मित्रांचे, नेत्यांचे, अभिनेत्यांची वाढदिवस, रक्तदान शिबिरे, गणेशोत्सव, हळदी-कुंकू, हादगा इत्यादी अनेक कार्यक्रमातून अनेक आयोजक त्याच्याकडून बीजगोळे घेऊन जातात. त्यामुळे त्यांनी वृक्षसंपदेवर शेकडो व्याख्यान माला ही केल्या आहेत. त्यातून त्यांनी निसर्ग व वृक्षसंपदा याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - 'माझी वसुंधरा अभियान'; सोलापूर महानगरपालिका शहरात लावणार एक लाख झाडे