ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील दहावीतल्या विद्यार्थ्याने बनवली चॅर्जिंगवरील सायकल, तासी 25 किलोमीटर वेगाने धावते - A charging bicycle

जिल्ह्यातील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने चक्क कल्पकतेच्या जोरावर विजेवर चालणारी सायकल बनवण्याचा पराक्रम केला आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव आर मधील हेमुजी चंदेले महाविद्यालयातील इयत्ता १०)वी'चा विद्यार्थी संकेत परमेश्वर गायकवाड यानी बँटरीवर चालणारी सायकलचा शोध लावला आहे. संकेत गायकवाड याच्या या कल्पनेचा जिल्ह्याभरात कौतुकाचा विषय झाला आहे.

सायकल बनवणाऱ्या विद्यार्थ्यासह गावकरी
सायकल बनवणाऱ्या विद्यार्थ्यासह गावकरी
author img

By

Published : Sep 5, 2021, 6:33 PM IST

Updated : Sep 5, 2021, 8:29 PM IST

सोलापूर - जिल्ह्यातील दहावीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने चक्क कल्पकतेच्या जोरावर विजेवर चालणारी सायकल बनवण्याचा पराक्रम केला आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव आर मधील हेमुजी चंदेले महाविद्यालयातील इयत्ता १०)वी'चा विद्यार्थी संकेत परमेश्वर गायकवाड यानी बँटरीवर चालणारी सायकलचा शोध लावला आहे. संकेत गायकवाड याच्या या कल्पनेचा जिल्ह्याभरात कौतुकाचा विषय झाला आहे. सध्याच्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. अशा काल्पनिक त्यामुळे सामान्य माणसांनाही दिलासा मिळणार आहे.

'संकेतला विजेवरची दुचाकी पाहून सुचली कल्पना'

शेळगाव आर मधील हेमुजी चंदेले महविदयालय शेळगाव आर इयत्ता १० वी'चा विद्यार्थी संकेत परमेश्वर गायकवाड हा घरापासून शेतात जायचे म्हटले, की किमान पंधरा ते सोळा किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ऑनलाइन शिक्षणामुळे तिथे जायला अडचणी यायच्या. मात्र, वडिलांचा सारखा तगादा असायचा, की तू शेताकडे ये मग अभ्यास करून शेताकडे जाणं व्हायचं पण धावपळ प्रचंड व्हायची अशाच एकदा धावपळीत शेजारून इलेक्ट्रिक दुचाकी गेल्याचे पाहिले. दुचाकी इलेक्ट्रिक गाडी घ्यायची परिस्थिती तर नाही मग काय करायचे, जर आपल्याकडे आहे. स्वतः जवळ असणारे सायकली वरच प्रयोग करण्याचा निश्चय केला.

साधी सायकल ते बॅटरीवरील सायकलचा सुरू झाला प्रवास

सुरुवातीला कशाचीही माहिती नव्हती. हळूहळू ज्या माध्यमातून माहिती मिळेल त्या माध्यमातून माहिती उपलब्ध करत प्रयोग सुरू केला. यासाठी जुन्या दोन सायकली खराब झाल्या. मात्र, तिसऱ्या जुन्या सायकलीने आधार देत प्रयोग प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात केली. अर्धा एचपीची मोटार, जुन्या पाठीवरील पंपाच्या चोवीस वॅटच्या दोन बॅटऱ्या, लाईट, हॉर्न आणि कंट्रोलर वापरुन जुनी सायकल रस्त्यावर तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नातून धावू लागली. दोन तास चार्ज केल्यानंतर सुमारे 25 किलोमीटरपर्यंत ही सायकल धावत असून, सायकल चालू असताना पायडल मारण्याची गरज नाही. बॅटरी संपल्यानंतर पायडल वापर करु शकतो. सायकलची ही बॅटरी घरातील लाईटवरच चार्ज करता येते. आता तो भविष्यात सायकलचे पायडल मारले, तरी बॅटरी चार्ज झाली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

Last Updated : Sep 5, 2021, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.