ETV Bharat / state

विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या 9 मूर्ती बदलणार - Sri Vitthal-Rukmini Temple

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे प्राचीन असल्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील परिवार देवतातील 28 मूर्तींपैकी नऊ मूर्तीं जीर्ण झाल्या आहेत. त्या मूर्ती भंग पावल्या आहेत, अशा मूर्ती हिंदू धर्मानुसार अशुभ मानल्या जातात.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर
विठ्ठल रुक्मिणी मंदिर
author img

By

Published : Dec 21, 2020, 4:10 PM IST

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व परिवार देवतातील जीर्ण 28 मुर्तींपैकी 9 मूर्ती बदलण्यात येणार आहेत. विठ्ठल व रुक्मिणी मंदिरात 2 दिवसांपासून होमहवन सुरू करण्यात आले आहे. 24 डिसेंबरला या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. याबाबत विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने काही दिवसापूर्वी सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी

28 मूर्तींपैकी 9 मूर्तीं जीर्ण झाल्या-

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे प्राचीन असल्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील परिवार देवतातील 28 मूर्तींपैकी 9 मूर्तीं जीर्ण झाल्या आहेत. त्या मूर्ती भंग पावल्या आहेत, अशा मूर्ती हिंदू धर्मानुसार अशुभ मानल्या जातात. त्यामुळे जीर्ण उद्धार झालेल्या मूर्तीं हिंदू धर्मानुसार बदलन्यात येणार आहेत. तसेच येत्या 24 डिसेंबर रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या मूर्ती काढण्याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

2 दिवसांपासून मूर्ती काढण्याचे काम सुरू-

विठ्ठल मंदिरात 2 दिवसांपासून मूर्ती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता होमहवन करण्यात येत आहे. या मूर्तींपैकी विठ्ठल मंदिरातील बोधले महाराज समाधीजवळील श्री विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीसह 3 गणेश मूर्ती, 1 खंडोबा, 1 काळभैरव, गरुड, हनुमंताच्या मूर्तींचा समावेश आहे. 24 डिसेंबरला हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे नविन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अगोदर ज्या रूपात, आकारात मूर्ती होत्या. त्याच स्वरूपात नविन मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. पंढरपूर येथील मूर्तिकार परदेशी यांनी हुबेहूब मूर्ती बनवल्या आहेत.

हेही वाचा- कोरोनाच्या प्रसारामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा स्थगित

हेही वाचा- शिवसेनेला मोठा धक्का ! बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.