ETV Bharat / state

पंढरपुरात 42 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा आकडा पाच हजार पार

पंढरपूर शहर व तालुक्यात 42 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. बाधितांचा एकुण आकडा 5 हजार 37 वर पोहोचला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Oct 6, 2020, 10:57 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - कोरोना व्हायरसने पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना हैराण केले आहे. टाळेबंदीमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात होती. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर यात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत गेली आहे. आज (दि. 6 ऑक्टोबर) शहरात 30, तर ग्रामीणमध्ये 12, असे 42 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर व तालुका मिळून बाधितांची एकूण संख्या 5 हजार 37 इतकी झाली आहे. यात 125 जणांचा मृत्यू झालेला असून आजपर्यंत 4 हजार 232 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर काम करत आहेत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे, ऑक्सिजन पातळी तपासणे आदी कामे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांना तोंडावर मास्क बांधणे व सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन केले जात नाही.

हेही वाचा - सात लाखांची रक्कम असलेली पर्स वापस करत तरुणाचे प्रामाणिकणाचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.