ETV Bharat / state

सोलापुरात वाळू चोरी करणाऱ्या ३८ बोटी उद्ध्वस्त; गुन्हेगार मात्र मोकाट

३ तालुक्यांनी एकत्र येऊन वाळू माफियांविरोधात मोहिम उघडली. याचाच भाग म्हणून गुरुवारी ३८ बोटी जिलेटिनच्या सहाय्याने जाळण्यात आल्या.

सोलापूर येथे वाळू चोरी करणाऱ्या ३८ बोटी जाळल्या
author img

By

Published : Mar 17, 2019, 1:18 PM IST

सोलापूर - उजनी धरणातून वाळू चोरणाऱ्या तब्बल ३८ यांत्रिक बोटींना जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई जिल्ह्यातील ३ तालुक्यांनी मिळून केली आहे. पण, यात कोणालाही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे वाळू चोरणाऱ्यांवर कारवाई झाली नाही.

सोलापूर येथे वाळू चोरी करणाऱ्या ३८ बोटी जाळल्या

उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीचा प्रकार काही दिवसांपासून घडत होता. त्यामुळे इंदापूर, दौंड आणि करमाळा या ३ तालुक्यांनी एकत्र येऊन वाळू माफियांविरोधात मोहिम उघडली. याचाच भाग म्हणून गुरुवारी ३८ बोटी जिलेटिनच्या सहाय्याने जाळण्यात आल्या.

तीन तालुक्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करूनही गुन्हेगार सापडत नाहीत. यामुळे शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. कारवाई करत असताना वाळू माफिया पळून गेले असे सांगण्यात येत आहे. पण, बोटी सापडू शकतात तर गुन्हेगार कसे निसटू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या मोठ्या कारवाईवर संशयाचे धुके पसरले आहे.

Intro:R_MH_SOL_02_17_NO_FIR_IN_SAND_CHORI_S_PAWAR
वाळू चोरणाऱ्या बोटी 38 बोटी जाळल्या
कारवाई मात्र कोणावरच नाही
सोलापूर-
उजनी धरणातून मोठया प्रमाणावर वाळू चोरणाऱ्या तब्बल 38 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साह्याने उद्धस्त करण्यात आल्या असल्या तरी वाळू चोरी प्रकरणी कोणावरही गून्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाळू उपसा करणाऱ्या बोटी सापडल्या मात्र वाळू चोरणारे माफिया पळून गेले असाच प्रकार घडला आहे. Body:उजनी धरणातून मोठ्या प्रमाणार वाळूंची चोरी केली जात आहे. उजनी धरणात वाळू चोरी करत असतांना दोन ते तीन तालूक्यातील सीमेवरून वाळू चोरी केली जात होती. तहसील कार्यालयाच्या सीमेच्या प्रश्नाचा फायदा हे वाळू चोर घेत होते. यावर उपाय म्हणून इंदापूर, दौंड आणि करमाळा या तीन तहसील कार्यायलयाने एकत्रित येऊन वाळू माफियांच्या विरोधात मोहिम उघडली. यामध्ये गुरूवारी एका दिवसात तब्बल 38 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साह्याने उ़डवून देण्यात आल्या आहेत. मागील अनेक दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई तीनही तहसील कार्यालयाच्या संयूक्त पथकाने केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू चोरीच्या विरोधात इंदापूर,दौंड आणि करमाळा तहसील कार्यालयाने एकत्रित कार्यवाही करून 38 यांत्रिक बोटी जाळून टाकल्या आहेत. मात्र या कारवाईत कोणावरही साधा गून्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही. 38 यांत्रिक बोटी जाळण्यात आलेल्या असतांना तीन तालूक्यातील पथकाला एकही माणूस सापडला नाही ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.
वाळू माफियांना सोडले की पळाले
तीन तहसील कार्यालयाच्या संयूक्त पथकाने एवढी मोठी कारवाई केलेली असतांना या पथकाला कोणीही सापडले नाही. कारवाई करत असतांना वाळू माफिया हे पळून गेले असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात वाळू माफियांवर हे पळून गेले की त्यांना सोडण्यात आले आहे अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.