ETV Bharat / state

ऑनलाइन बुकिंगद्वारे विठ्ठलाचे दर्शन घेता येणार, परिसरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी - विठ्ठल मंदीर पंढरपूर

मात्र भाविकांना प्रवेश बंविठ्ठल मंदिरामध्ये यंदा थेट जरी दर्शन नसले, तरी ऑनलाईन संकेतस्थळावरुन 24 तास दर्शन मिळणार आहे. 24 जूनपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर नित्योपचार सुरू आहेत.दच

24 hours online darshan of Vitthal started in pandharpur
ऑनलाइन बुकिंगद्वारे विठ्ठलाचे दर्शन घेता येणार
author img

By

Published : Jun 27, 2020, 4:49 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - विठ्ठल मंदिरामध्ये यंदा थेट जरी दर्शन नसले, तरी ऑनलाईन संकेतस्थळावरुन 24 तास दर्शन मिळणार आहे. 24 जूनपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर नित्योपचार सुरू आहेत. मात्र, वारकरऱ्यांना मंदिर आणि परिसरात प्रवेशबंदी असणार आहे. मंदिर समितिच्या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करून विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळवर ऑनलाइन बूकिंग दर्शन असणार आहे.

परंपरेप्रमाणे विठोबाचा पलंग काढून चोवीस तासांसाठी मंदिर नित्योपचारासाठी खुले करण्यात आले आहे. प्रतिवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला पांडुरंगाचा पलंग काढला जातो. विठोबाला लोड तर रुक्मिणी मातेला तककया देण्यात येणार आहे. ऑनलाइन चोवीस तास दर्शन भक्तांसाठी सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांना दर्शन बंद आहे. प्रथा-परंपरेचा एक भाग म्हणून विठुरायांच्या शेजघरातील पलंग काढून टाकण्यात आला.

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे नित्योपचार होणार आहेत. त्यामधे नित्यापूजा, महानैवेद्य, लिंबूपाणी असे नित्योपचाराचे विधी असणार आहेत. हे विधी आषाढी यात्रा कालावधीत होणार आहेत. कोरोनामुळे विठ्ठल मंदिर गेल्या चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे आषाढी यात्राही रद्द करण्यात आली आहे. मंदिर 30 जूनपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर , कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.