ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 330, आज 22 रूग्णांची वाढ, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू - सोलापूर कोरोना न्यूज

आत्तापर्यंत एकूण 3713 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील 3481 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3151 निगेटिव्ह तर 330 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 330, आज 22 रूग्णांची वाढ, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

author img

By

Published : May 14, 2020, 11:41 PM IST

सोलापूर - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एका दिवसात तब्बल 22 कोरोनाबाधित आढळून आले असून आतापर्यंत एकूण 330 जण कोरोनाबाधित झाले असून 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज 22ने वाढून 330 इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या 1 ने वाढून 22 झाली आहे. आज एका दिवसात 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात 99 निगेटिव्ह तर 22 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत एकूण 3713 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील 3481 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3151 निगेटिव्ह तर 330 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे, तर केगांव क्वारंटाईन सेंटरमधून 88 जणांना सोडण्यात आले.

या परिसरातील आढळले रुग्ण -

निलमनगर एमआयडीसी रोड येथील 2 महिला,

कोनापुरे चाळ रेल्वे लाईन्स येथील 1 महिला

कुमठा नाका परिसर 1 पुरुष,

नई जिंदगी (मूळ गाव सूलतानपूर उस्मानाबाद) 1 महिला,

नवनाथ नगर एमआयडीसी 2 पुरुष, 1 महिला,

अशोक चौक 3 पुरुष, 4 महिला,

न्यू पाच्छा पेठ 2 पुरुष, 4 महिला,

लष्कर भागातील 1 महिला यांचा समावेश आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांत 181 पुरूष तर 149 महिलांचा समावेश आहे. तर मृत 22 मध्ये 11 पुरूष, 11 महिलांचा समावेश आहे. कोरोनामधून मूक्त झालेल्या 106 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज जी महिला मृत पावली ती 65 वर्षीय असून सूलतानपूर जि. उस्मानाबाद येथील आहे. नई जिंदगीत नातेवाईकांकडे ती 18 मार्चला आली होती. 12 मे रोजी त्रास होऊ लागल्याने सिव्हीलमध्ये उपचारासाठी आली. आज सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.