ETV Bharat / state

सोलापुरात सोमवारी 200 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 3 मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात सोमवारी 200 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सोलापूरातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 829 इतकी झाली आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Jul 21, 2020, 2:50 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात सोमवारी 200 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 829 इतकी झाली आहे. तर, सोलापुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 372 इतकी आहे.

कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सोलापूर शहरासह 30 गावात 16 जुलै ते 26 जुलै अशी दहा दिवसांची संचारबंदी लावली आहे. तरी देखील रुग्ण वाढण्याचा गुणाकार काही कमी होताना दिसत नाही.

हेही वाचा - राज्यात ८२४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १७६ मृत्यू

सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी 1495 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1324 निगेटिव्ह तर 171 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर 3 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा आरोग्य प्रशासन हतबल होत असल्याचे दिसत आहे.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील शहरात सोमवारी फक्त 100 अहवाल प्राप्त झाले. यात 71 निगेटिव्ह 29 पॉझिटिव्ह आहे. तर 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी एका दिवसात शहर आणि जिल्ह्यात मिळून 200 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून आजच्या स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 829 आहे, तर मृतांची संख्या 372 झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून 2 हजार 751 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 2706 जण बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.