सोलापूर - बोरामणी जिल्हापरिषद गटातील १४ गावातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत वंचित बहुजन आघडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे येथे रविवारी बोरामणी जिल्हापरिषद गटातील १४ गावातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
माजी सभापती नळपती बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे माजी संचालक डी. एन. गायकवाड, वरळेगावचे माजी सरपंच भिमा माने, उळ्याचे प्रशांत गायकवाड, प्रा. सिद्धार्थ तडसरे, सरपंच पुंडलीक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रकाश आंबेडकर यांना आपल्या भागातून तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. १४ गावातून जास्त मताधिक्य मिळण्यासाठी सर्वांनी बूथ कमिठ्या अधिक सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. बाळासाहेबांना मताधिक्य मिळण्यासाठी सर्वांनी काम करण्याचे एक मताने ठरले.
या बैठकीस बाळासाहेब बनसोडे, मिलिंद खरात, शांतकुमार गायकवाड, सचिन रनसुरे, सुधीर गायकवाड, गौतम गायकवाड, महेंद्र राजगुरु, श्रीपती राजगुरु, उमाकांत येरवडे, विजय माने, अजित माने, नारायण राजगुरु, सागर गायकवाड, चिरंजीव माने, स्वप्निल गायकवाड, दीपक सलवदे, सुहास गायकवाड, दयानंद कांबळे, बाबू लोंढे आदी विविध गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.