सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 621 वर पोहोचली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात तब्बल 59 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्याचेही प्रमाण वाढवले आहेत.
कोरोनाच्या चाचणीसाठी सोलापुरात स्वतंत्र लॅब उभरण्यात आली आहे. यात दिवसात जवळपास 100 जणांची चाचणी केली जात आहे. आतापर्यंत सोलापुरात एकूण 5 हजार 844 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 हजार 223 जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तर 621 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. यातील 227 जण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 335 जणांवर उपचार सुरू आहेत. गंभीर बाब म्हणजे 59 जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - 'सोलापुरात 2 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन; शेतकऱ्यांच्या बांधावर खत, बियाणांचे वाटप'
हेही वाचा - कोरोनाचे संकट दूर होऊन आजारी बरे व्हावेत; ईदला मुस्लीम बांधवांची 'अल्लाह'कडे 'प्रार्थना'