ETV Bharat / state

सोलापूर बाजार समितीत दीड लाख क्विंटल कांद्याची विक्री; ५ दिवसात कोट्यवधीची उलाढाल - 5 Crore Onion Sales Solapur market

सलग महिनाभर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेला कांदा सडला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या कांद्याला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ लाख ६२ हजार ५०० क्विंटल कांद्याची विक्री झाली आहे. त्यातून ७१ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

solapur
सोलापूर कांदा बाजार
author img

By

Published : Dec 9, 2019, 12:58 PM IST

सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील ५ दिवसात तब्बल ७१ कोटी रुपयांची कांदा विक्री झाली आहे. कांदा विक्रीसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूरचे नाव लौकिक आहे. मागील पाच दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्यामुळे कांद्याची आवक वाढली. त्यामुळे ७१ कोटी पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटल पेक्षा जास्त कांदा विक्री

सलग महिनाभर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेला कांदा सडला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या कांद्याला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ लाख ६२ हजार ५०० क्विंटल कांद्याची विक्री झाली आहे. या विक्रीतून ७१ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. तेच डिसेंबर २०१८ या महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण ८ लाख ५० हजार क्विंटल कांदा विक्री झाला होता. या विक्रीतून ४८ कोटी ३५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होते. मात्र, ते संपूर्ण डिसेंबर महिन्यात झालेल्या कांदा विक्रीतून मिळाले होते. मात्र, चालू वर्षी फक्त पाच दिवसातच कांदा विक्रीतून ७१ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

Intro:कांदा : 5 दिवसात 71 कोटी रुपयांची उलाढाल, सोलापूर बाजार समिती दीड लाख क्विंटल पेक्षा जास्त कांदा विक्री

सोलापूर-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील पाच दिवसात तब्बल 71 कोटी रुपयांची कांदा विक्रीतून उलाढाल झाली आहे. कांदा विक्रीसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूरच्या नावलौकिक असल्यामुळे मागील पाच दिवसात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल एक लाख 63 हजार क्विंटल कांद्याची विक्री झाली असून त्यातून 71 कोटी बारा लाख रुपये एवढे पैसे कांदा उत्पादकांना मिळाले आहेत

Body:मागील पाच दिवसांमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या कांदा हा पावसामुळे सडला होता . सलग महिनाभर ोसळणार्‍या पावसामुळे शेतकऱ्याचे कांदे पिकाचे मोठे नुकसान झाले त्यानंतर आता उरलासुरला थोडाफार खांदा बाजारात विक्रीसाठी नेत असताना त्याला चांगला भाव मिळत आहे संपूर्ण देशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक लाख 62 हजार 500 क्विंटल कांद्याची विक्री झाली आहे या विक्रीतून 71 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे मागील वर्षी संपूर्ण डिसेंबर महिन्यात 48 कोटी 35 लाख रुपयांची कांद्याची उलाढाल झाली होती तर चालू वर्षी फक्त पाच दिवसात 71 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
डिसेंबर 2018 या महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण आठ लाख पन्नास हजार क्विंटल कांदा विक्री झाला होता या विक्रीतून 48 कोटी 35 लाख एवढे पैसे मिळाले होते संपूर्ण डिसेंबर महिन्यात आठ लाख 49 हजार क्विंटल कांदा विकून त्यातून 48 कोटी मिळाले असताना चालू वर्षी फक्त पाच दिवसात एक लाख 63 हजार क्विंटल कांद्याचे 71 कोटी रुपये कांदा विक्रीतून मिळालेले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.