सिंधुदुर्ग - मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावरील ईडी चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.
शिवसेनेवर तोंडसुखासाठी सोमैय्या पुढे
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले आहे. अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. वडिलोपार्जित घराची त्यांनी दुरुस्ती त्यांनी केली असून सिंधुदुर्गात त्यांची या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांचे मोठे नाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत अनिल परब यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार सोमय्या यांच्याकडून होत आहे.
राणेंच्या 53 कोटीच्या मालमत्तेची चौकशी
कुडाळ येथील एसटी डेपोचे काम २ कोटीचे होते. इंजिनियर कंपनीने हे काम केले, ते कोणाच्या जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहे. जर २ कोटीच्या कामाच अडीच कोटीचा घोटाळा कसा झाला ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या 53 कोटीच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली. नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले कुठून? यात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी का थांबली ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या जर यापुढे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर असे बेछूट आरोप करत राहिले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा - 'त्या' यादीतून वगळले तरीही फरक पडणार नाही, मात्र हिशेब चुकते करू - शेट्टी