ETV Bharat / state

Vinayak Raut On Narayan Rane तेव्हापासून नारायण राणे लोकसभेची पायरी चढले नाहीत, विनायक राऊत यांचा हल्लाबोल

author img

By

Published : Jan 3, 2023, 3:43 PM IST

खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Vinayak Raut Criticize To Narayan Rane ) यांच्यासह मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राणेंच्या सचिवाने अनेकांना गंडा घातल्याने पंतप्रधान मोदींनी त्यांना दम भरल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. तर मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांच्या बोगस डिग्रीचे पुरावे ( Uday Samant Bogus Degree ) भाजपनेच उघड केल्याचेही ते म्हणाले. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणेंनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिल्याचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

Vinayak Raut On Narayan Rane
खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग - खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Vinayak Raut Criticize To Narayan Rane ) आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातला. यानंतर मोदींनी त्यांना चांगला दम भरला. तर केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देणाऱ्या राणेंची फजिती झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत लोकसभेची पायरी चढलेली नाही. उदय सामंत यांची डिग्री बोगस ( Uday Samant Bogus Degree ) असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

खासदार विनायक राऊत

कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार विनायक राऊत बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

नारायण राणेंच्या सचिवाने अनेकांना घातला गंडा नारायण राणे यांच्या सचिवाने ( Union Minister Narayan Rane ) अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचे विनायक राऊत यावेळी म्हणाले.

केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर नारायण राणे हे एकदा लोकसभेत बोलताना केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देत होते. केरळच्या खासदाराने इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला. यांनी हेडफोन लावला होता. हेडफोनमध्ये हिंदीमध्ये काय सांगितले हे यांना समजले नाही. आधीच यांना मालवणी धड बोलता येत नाही. मराठी देखील ते नीट बोलत नाहीत. फडणवीस शब्दाचा त्यांना साधा उच्चार करता येत नाही. यांच्या हिंदीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे हेडफोनमध्ये काय सांगितले गेले हे त्यांना समजले नाही. हे उभे राहिले आणि केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देऊ लागले. यावेळी त्यांची चांगलीच फजिती झाली. मात्र त्या घटनेनंतर आजपर्यंत नारायण राणे ( Vinayak Raut Criticize To Narayan Rane ) हे लोकसभेची पायरी चढलेले नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. लोकसभेच्या कारकिर्दीत प्रश्नोत्तराच्या वेळी आपण एकदा तरी उभे राहिलात का असा प्रश्न देखील नारायण राणे यांना त्यांनी केला. जिल्हा वासियांना तरी सांगा एमएसएमई या शॉर्ट फॉर्मचा फुल फॉर्म, कळलेच नाही तर काय सांगणार, असे देखील यावेळी विनायक राऊत म्हणाले. जिल्ह्यात शिवसेना वाढत आहे ते एका मंत्र्याला थोपत नाही, म्हणून सात सात मंत्री या जिल्ह्यात राणे घेऊन येतात असी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली.

सामंतांची डिग्री बोगस असल्याचे पुरावे भाजपनेच दिले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला. उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचे पुरावे भाजपानेच मीडियाला दिले असे ते म्हणाले. आधी अब्दुल सत्तार यांना आडवे केले. संजय राठोड यांना भाजपने सोडले नाही. आता उदय सामंत यांची पाळी आहे. उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याला किंवा सरपंच झालास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा बांधकाम क्षेत्रातला घोटाळा आणि डांबरातला काळाबाजार आम्ही कधीही उघड करू शकतो असा इशारा देखील राऊत यांनी यावेळी दिला.

शिंदे सरकारचे आउट घटकेचे राजकारण शिंदे सरकारचे आउट घटकेचे राजकारण दोन ते तीन महिने झाले. त्यानंतर त्यांचा विसर्जन भारतीय जनता पक्षच करेल, असे भाकीत यावेळी विनायक राऊत यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.