ETV Bharat / state

SPECIAL REPORT : हापूसची चव महिला बागायतदारांसाठी आंबटच - पाऊस फटका हापूस आंबारा सिंधुदुर्ग

देवगड हापूस म्हटला ( Hapus mango in sindhudurg ) की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, हा हापूस बागायतदारांच्या तोंडाला घाम फोडत आहे. निसर्गाच्या लहरीपणानं इथल्या हापूसवर ( Hapus mango news sindhudurg ) मोठा परिणाम झालेला आहे. देवगड तालुक्यात ( Hapus mango in Devgad ) हापूस बागायतीच्या माध्यमातून स्वतःच्या अर्थार्जनाचे साधन निर्माण करणाऱ्या महिला भगिनींना याचा मोठा फटका बसत आहे.

hapus mango in sindhudurg
पाऊस फटका हापूस आंबारा सिंधुदुर्ग
author img

By

Published : May 28, 2022, 8:16 AM IST

सिंधुदुर्ग - देवगड हापूस म्हटला ( Hapus mango in sindhudurg ) की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र, हा हापूस बागायतदारांच्या तोंडाला घाम फोडत आहे. निसर्गाच्या लहरीपणानं इथल्या हापूसवर ( Hapus mango news sindhudurg ) मोठा परिणाम झालेला आहे. देवगड तालुक्यात ( Hapus mango in Devgad ) हापूस बागायतीच्या माध्यमातून स्वतःच्या अर्थार्जनाचे साधन निर्माण करणाऱ्या महिला भगिनींना याचा मोठा फटका बसत आहे. अपार मेहनत करूनही फारसे काही हाती लागत नाही. हापूसची चवही महिला ( Rain affect hapus mango ) बागायतदारांसाठी आंबटच आहे, अशी व्यथा येथील महिला भगिनींनी मांडली आहे.

माहिती देताना हापूस बागायतदार

हेही वाचा - कोकणी ही गोव्याची राज्यभाषा, मराठीची बोलीभाषा नाही - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

देवगड तालुक्यातील इळये ( hapus mango news ) गावात महिलांच्या हाताला रोजगार मिळावा याकरिता सातत्याने प्रयत्नशील असलेल्या रंजना कदम यादेखील एक बागायतदार आहेत. त्या म्हणतात की, अवकाळी पावसाचा परिणाम हापूस बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, या भागातील पर्जन्य मापक यंत्रणा सदोष असल्यामुळे या भागात पडलेल्या पावसाची नोंद व्यवस्थितपणे केली जात नाही. परिणामी, अवकाळी मुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. थ्रीप्स सारख्या रोगामुळे बागायतीचे मोठे नुकसान होते. कितीही औषधे फवारली तरी काहीही परिणाम होत नाही. म्हणून सरकारने नव्याने संशोधन करून यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही रंजना कदम यांनी सांगितले.

इळये गावातील विद्या नाईक या उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सी.आर.पी म्हणून काम पाहतात. या भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक बचत गट त्यांनी स्थापन केले आहेत. त्या सांगतात, अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक उष्णता वाढते, यामुळे आंबा भाजला जातो. परिणामी आंबा हाताशी येत असताना बागायतदारांचे मोठे नुकसान होते.

विनया विठ्ठल गावडे यादेखील बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या उपाय योजना सातत्याने निर्माण करत असतात. आंब्यावर आधारित विविध पदार्थ आपल्या सहकारी महिलांच्या माध्यमातून बनविण्याचे काम त्या करतात. त्या म्हणतात की, नैसर्गिक आपत्तीमुळे हापूसचे नुकसान होते. परिणामी कच्च्या मालाचा दर वाढतो आणि आम्हाला तो परवडत नाही. आम्ही बनवतो त्या वस्तूंना खूप मागणी आहे, मात्र कच्चा मालच आम्हाला परवडत नसल्याने आम्ही उत्पादित केलेला माल महाग विकावा लागतो. त्याला मागणी कमी येते, त्यामुळे आमचे देखील नुकसान होते. एकंदरीत देवगड हापूस हा या भागातील महिलांच्या अर्थकारणाचे प्रमुख माध्यम असले तरी, अन्य भागात चवीने खाल्ला जाणार हा हापूस मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक महिलांचे अर्थकारण बिघडवणारा ठरत आहे.

हेही वाचा - Boat Sank in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 पर्यटक असलेली बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.