सिंधुदुर्ग - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या पाच व ग्रामीण रुग्णालयातील दोन अशा सात रुग्णांचे मृत्यू हे कोरोनामुळे झालेले नाहीत. ते अन्य कारणांमुळे झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरून जाऊ नये, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या जुन्या डीपीडीसी हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंधरा एप्रिलपासून जिल्हा रुग्णालयातील पाच व ग्रामीण रुग्णालयात दोन अशा एकूण सात रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र, या सातही जणांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. या सातही जणांचा अन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रुग्णांचा कोरोनाशी काही संबंध नाही. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.