ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, रिक्षावर झाड कोसळून दोघे जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सावंतवाडी येथील एक झाड चालत्या रिक्षावर पडले. यात दोघे जखमी झाले आहे.

auto rickshaw
अपघातग्रस्त रिक्षा
author img

By

Published : May 13, 2020, 8:10 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर सावंतवाडीत रिक्षावर झाड कोसळल्याने दोघे जखमी झालेत.

जिल्ह्यातील काही दृश्ये

जिल्ह्यातील आंबोली, चौकुळ, सावंतवाडी, माणगाव भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. तसेच सावंतवाडीत वादळी वाऱ्यामुळे चालत्या रिक्षेवर झाड कोसळल्यामुळे दोघेजण जखमी झाले आहेत.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. झाडे पडल्याने वीज वाहिन्या आहेत. त्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वेंगुर्ले, मालवण, देवगडमधील आंबा हंगाम अजूनही संपलेला नाही. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने येथील हापुसचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा - महाराष्ट्र-गोवा सीमेवर एकदाच होणार वाहनांची तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.