ETV Bharat / state

MLA Nitesh Rane Allegations : संतोष परब हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न - आमदार राणे - Santosh Parab Case

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक ( Sindhudurg DCC Bank Election ) प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात ( Santosh Parab Case ) आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane Alleges on Government ) यांनी केला आहे.

आमदार राणेंसह सचिन सातपुते
आमदार राणेंसह सचिन सातपुते
author img

By

Published : Dec 26, 2021, 8:30 PM IST

Updated : Dec 27, 2021, 1:28 PM IST

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक ( Sindhudurg DCC Bank Election ) प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात ( Santosh Parab Case ) आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane Alleges on Government ) यांनी केला आहे.

बोलताना आमदार राणे

सातपुतेने भाजपकडून लढवली होती पुणे महापालिकेची निवडणूक

सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुतेचा फोन बंद करून होता. यापूर्वी या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नितेश राणे यांची याच प्रकरणी कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.

या प्रकरणात आपल्याला अडकवले जाते

संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतोष परब खुनी हल्ला प्रकरणात आपली चौकशी करून या प्रकरणांमध्ये आपल्याला गुंतवले जात आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला ( MLA Nitesh Rane Alleges on Government ) आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.

नितेश राणे यांची जिल्हा पोलिसांनी केली होती चौकशी

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामनामधून कठोर टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यावेळी पुण्यातील 'सामना' कार्यालय फोडण्याच्या आरोपामध्ये सचिन सातपुतेला अटक करण्यात आली होती. त्याला अटक होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव पोलिसांवर होता. नितेश राणे यांची पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होती. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले.

काय आहे प्रकरण..?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब हे दुचाकीवरुन कनकर येथे जात असताना यांच्यावर चारचाकीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला मागून धड दिली. त्यानंतर चाकूने वार करुन परब यांना जखमी केले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा - Police Notice to Nitesh Rane : नितेश राणेंना चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, संतोष परब हल्ला प्रकरण

Last Updated : Dec 27, 2021, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.