सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे एका घरावर वडाचे झाड कोसळले आहे. चेतन जामसंडेकर यांचे हे घर असून यामुळे त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी पावसाळ्यात झाडे उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील चेतन जामसंडेकर यांच्या घरासमोर वडाचे झाड होते. या झाडाला पारही बांधण्यात आला होता. अलीकडे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून, वेगवान वाहणाऱ्या वाऱ्याने हे झाड कोसळले. हे झाड नेमके घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.