ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण बाधितांची संख्या ८ वर - लॉकडाऊन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8 झाली आहे. जिल्ह्यात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढत असून रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

three more corona infected patient found in sindhudurg
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर
author img

By

Published : May 15, 2020, 11:47 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गुरुवारी आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दिली आहे. देवगडमध्ये सापडलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये एक 21 वर्षीय तरुण व एका 24 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तर तिसरा रुग्ण नेरूर येथील असून ती 24 वर्षीय तरुणी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यातील दोघे जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दोघांचा फेरतपासणी चाचणी अहवाल एक दिवसापूर्वीच निगेटिव्ह आला होता. जिल्ह्यात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढत असून रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.