ETV Bharat / state

हत्तींनंतर सिंधुदुर्गात आता गव्यांचा धुमाकूळ; शेतीचे मोठे नुकसान - Sindhudurg elephant

सावंतवाडी शिरोडा राज्यमार्गावरील माजगाव पंचम नगर परिसरात गेले काही दिवस गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळाला.

Sindhudurg elephant
हत्तींनंतर सिंधुदुर्गात आता गव्यांकडून शेतीचे मोठे नुकसान
author img

By

Published : Jul 10, 2020, 8:02 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सध्या हत्तींसोबत गव्यांकडून शेतीचे मोठे नुकसान केले जात आहे. सावंतवाडी, कणकवली, मालवण तालुक्यातील काही गावांमध्ये गव्यांनी शेतीचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून आधीच कोरोनाच्या संकटात अडकलेल्या येथील शेतकऱ्यांना गव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सावंतवाडी शिरोडा राज्यमार्गावरील माजगाव पंचम नगर परिसरात गेले काही दिवस गव्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळाला.

दिवसाढवळ्या गवे मुक्तपणे फिरत असल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव नेमळे परिसरात गव्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाकडून जंगल हद्दीवर सौर कुंपण उभारण्यात आले आहे. मात्र, असे असूनही अधूनमधून गव्यांचे दर्शन घडतच असते. या गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे. तर मालवण तालुक्यातील वडाचापाट गावात गवा रेड्यांचा त्रास वाढला आहे.

रात्रीच्या वेळी भात शेती सह काजू बागायती लागवड क्षेत्रात गवे रेडे कळपाने येऊन नुकसान करत आहेत. शासनाच्या वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथेही भर दिवसा कळपाने गवे दिसत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हे गवे शेतीचे नुकसान करत आहेत. सध्या जिल्ह्यात हत्ती हा शेतकरी आणि बागायतदारांच्या डोकेदुखीचा विषय बनला असताना, आता गव्यांचे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.