ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील आठवडी बाजार बंद - Mayor Kankavali

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने खबरदारी म्हणून दर मंगळवारी होणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

Kankavali weekly market closed
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील आठवडी बाजार बंद
author img

By

Published : Dec 1, 2020, 3:55 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे, खबरदारी म्हणून कणकवली नगरपंचायतीने दर मंगळवारी होणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

माहिती देताना कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे

सुरुवातीला दर दिवशी कणकवली शहरात कोरोनाचे २० ते २५ रुग्ण आढळून येत होते. मध्यंतरी आम्ही शहरात जनता कर्फ्यू पाळला, त्यावेळी रुग्ण आढळण्याची संख्या शून्यावर आली होती. आता पुन्हा एकदा रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आम्ही आठवडीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्णय

मागील आठवड्यात बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना आठवडी बाजार बंद राहाणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण, परराज्यातून व परजिल्ह्यातून येणारे विक्रते व त्यांच्या मालामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच, बाजारात गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले. दरम्यान, आज बाहेरील विक्रेते बाजारात आले नाहीत, त्यामुळे बाजारात फारशी वर्दळ दिसून आली नाही.

हेही वाचा - कुडाळ बसस्थानकात मनसेचे 'क्रिकेट खेळो' आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.