सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील 70 पैकी 55 ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाला आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय, ना येणार असे नितेश राणे यांनी निवडणूक विजयानंतर म्हटले आहे.
ही निवडणूक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील आहे आणि शेतकरी मतदारराजा आहे. त्यांनी भाजपाला दिलेले मतदान हे कृषी कायद्याला दिलेले समर्थन आहे असंही नितेश राणेंनी म्हटलंय. सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी कायद्यांना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
तोंडवली बावशीत २५ वर्षानंतर भाजपाची सत्ताग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप आमदार नितेश राणे यांचे कणकवली भाजपा कार्यालयाकडे जल्लोषात स्वागत भाजपा कार्यकर्त्यांनी केले. आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश हे मोदी सरकारच्या योजनांचे फलित असल्याचे सांगितले. देवगड तालुक्यात २३ पैकी १७ जागांवर वैभववाडीत १२ पैकी ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तोंडवली बावशीत २५ वर्षानंतर भाजपची सत्ता आली आहे.भिरवंडेत शिवसेनेचा नैतिक पराभव-राणेभिरवंडे गावात ५० च्या आत असणारी भाजपची मते २०० हुन जास्त झाली. भिरवंडेत शिवसेनेचा नैतिक पराभव झाला असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. जिल्ह्यात ७० पैकी ५५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला विजय मिळाला आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी कायद्याचा आहे. ग्रामीण भागातील जनता कृषी कायद्याच्या बाजूने असल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचेही आमदार राणे म्हणाले. हेही वाचा - संचयनी घोटाळ्यातही शिवसेनेचे नेते - नितेश राणे