ETV Bharat / state

सिंधुदुर्गतील बांदा आळवाडी बाजारपेठेत मध्यरात्री घुसले पाणी, ग्रामस्थांमध्ये घबराट

बांदा दशक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गतवर्षी संपूर्ण बांदा शहर पुराच्या पाण्याखाली गेल्याने एकच हाहाकार माजला होता. त्यामुळे गतवर्षीच्या पुराच्या आठवणीने बांदा व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज पहाटेच नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन आळवाडी बाजारपेठेत घुसले.

 river flood situation in bandha market at sindhudurg sindhudurg

author img

By

Published : Aug 5, 2020, 10:35 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी मध्यरात्री शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले. यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सकाळी पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी हे भीतीच्या छायेखाली आहेत.

बांदा दशक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गतवर्षी संपूर्ण बांदा शहर पुराच्या पाण्याखाली गेल्याने एकच हाहाकार माजला होता. त्यामुळे गतवर्षीच्या पुराच्या आठवणीने बांदा व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज पहाटेच नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन आळवाडी बाजारपेठेत घुसले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील दुकानांमध्ये रात्रीच पुराचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी तात्काळ दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. आळवाडी बाजारपेठेतील चिकन, मटण, मच्छी विक्रेते यांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याबाबत सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. बांदा परिसरातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. बांदा शहरातील बाजारपेठेत दरवर्षीच्या पावसाळ्यात पाणी घुसते. पावसाने जोर धरला कि येथील नागरिक रात्रभर जागून काढतात. कारण कधी पूर येथील रहिवाशी क्षेत्र व्यापेल याचा नेम नसतो. येथील तेरेखोल नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढत असून त्याचा फटका पावसाळ्यात बांदा शहराला बसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.