ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील जानवली पुलाजवळ टेम्पोला अपघात, १२ कामगार गंभीर जखमी - सिंधुदुर्गातील जानवली पुलाजवळ टेम्पोला अपघात

सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीत साईड पट्टीला संरक्षक बॅरिकेट बसविण्याचे काम सुरू आहे. जानवली पुलनाजीक हा टेम्पो आला आणि त्याचा टायर फुटला. या अपघातात टेम्पोमधील कॅटरिंगच्या सामानाचे तसेच टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गातील जानवली पुलाजवळ टेम्पोला अपघात

author img

By

Published : Feb 22, 2021, 6:59 AM IST

सिंधुदुर्ग - मुंबईहून गोव्याला जाणारा टेम्पो टायर फुटून दहा फूट सखल भागात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात टेम्पोमधील १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना जानवली पुलानजीक घडली.

टायर फुटल्याने घडला अपघात

सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीत साईड पट्टीला संरक्षक बॅरिकेट बसविण्याचे काम सुरू आहे. जानवली पुलनाजीक हा टेम्पो आला आणि त्याचा टायर फुटला. त्यामुळे हा टेम्पो कोसळून अपघात झाला. यात टेम्पोमधील कॅटरिंगच्या सामानाचे तसेच टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिकांनी केली जखमींना मदत

अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलीस तात्काळ या ठिकाणी आले आणि त्यांनी मार्ग वाहतुकीला खुला केला. स्थानिक नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या नागरिकांनी जखमींना विविध वाहनांद्वारे रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे सोपे गेले. हा टेम्पो या कामगारांना घेऊन गोवा येथे एका कार्यक्रमानिमित्त जात होता.

हेही वाचा - व्हिसाचे हमीपत्र लेखी द्या अन्यथा टी-२० विश्वकरंडक अमिरातीत खेळवण्याची मागणी करू - पाकिस्तान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.