ETV Bharat / state

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात एकवटले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक

author img

By

Published : Dec 25, 2020, 3:08 PM IST

Updated : Dec 25, 2020, 3:24 PM IST

आज सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिक्षक जिल्हा मुख्यालयावर धडकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रत्येक प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली.

Teachers
Teachers

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हाभरातील शिक्षक एकवटले होते. आज जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा या शिक्षकांनी निषेध केला.

एकाधिकारशाहीचा विरोध

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोवकर यांच्या एकाधिकारशाहीविरोधात जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षक आज एकवटले आणि जिल्हा परिषद प्रवेश दारासमोर लक्षवेधी आंदोलन करून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांच्यावर हल्लाबोल चढविला.

मागण्यांकडे दुर्लक्ष

गेले काही दिवस प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोवकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात जिल्हाभरातील प्राथमिक प्राथमिक शिक्षकांनी आवाज उठविला होता. 50% शिक्षक उपस्थिती, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व कला-क्रीडा स्पर्धाबाबतचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेले आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली होती. मात्र या मागण्यांकडे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत शिक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. उलट माझ्या आदेशावर मी ठाम आहे, असे प्रतिआव्हान दिले. त्यामुळे शिक्षक संतापले आणि आज जिल्हा परिषदेसमोर याविरोधात लक्षवेधी आंदोलन करीत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

प्रवेशद्वारावर तपासणी

आमचे आंदोलन जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात नाही, पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नाही. तर एकाधिकारशाही करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे, असे ठाम प्रतिपादन नितीन कदम यांनी यावेळी केले. आज सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिक्षक जिल्हा मुख्यालयावर धडकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रत्येक प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. यावेळी अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एकवटले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोवकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात घोषणाबाजी केली.

Last Updated : Dec 25, 2020, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.