सिंधुदुर्ग - जिल्हा दौऱ्यावर असलेल्या इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक सुधा मूर्ती यांनी कोकणातील रस्त्याबाबत वक्तव्य केले आहे. road is bad here अशी टिप्पणी येथील रस्त्यांच्या बाबत सुधा मूर्ती यांनी केली आहे. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या राजकीय प्रश्नाबाबत आपल्याला राजकारण माहित नाही असे सांगून हात जोडले आहे.
सुधा मूर्ती सिंधुदुर्ग दौऱ्यावर - इन्फोसिसच्या माजी अध्यक्ष सुधा मूर्ती या सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सुधा मूर्ती यांच्या प्रयत्नातून देवगड तालुक्यातील बापार्डे गावातल्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वाला गेले आहे. या इमारतीच्या औपचारिक उद्घाटनसाठी आलेल्या सुधा मूर्ती यांना माध्यम प्रतिनिधींनी कर्नाटक आणि कोकण बद्दल विचारले. यावेळी त्यांनी बोलताना कोकणातील आदरातिथ्याचे कौतुक केले आहे.
कोकण मला आवडले - कोकणात मी एकच दिवसासाठी आले, पण मला कोकण फारच आवडले. येथील निसर्ग माणसे, विद्यार्थी पाहून त्यांना भेटून आनंद वाटला असल्याचे त्या म्हणाल्या. दक्षिणेकडील कर्नाटकात आणि कोकणात फार फरक नाही, सिंधुदुर्ग पण छान आहे. पण तिकडे रस्ते उत्तम आहेत. इकडे तसे रस्ते दिसत नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे.
सुधा मूर्ती यांची प्रतिक्रिया - कोकणातील रस्त्यांच्या दुर्दशेने मला वादग्रस्त प्रश्न विचारू नका, असे सांगणाऱ्या सुधाताईंना कोकणातील रस्ते पाहून अगदी स्वाभाविकपणे नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटक केरळ या दक्षिणेकडिल निसर्ग पर्यटन व येथील पर्यटन यात काय निराळेपण दिसते, यावर त्यांनी वरील उत्तर दिले. आमच्याकडे कर्नाटकमधले कोकण तेथील निसर्ग असाच आहे, अस मत त्यांनी व्यक्त व्यक्त केले आहे.