ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी सज्ज - sindhudurg st bus in lock down

राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्याच्या राज्य सीमेवर दाखल होणारे जिल्ह्यातील नागरिक आणि राज्याच्या सीमेवर सोडावे लागणारे नागरिक यांच्यासाठी मोफत सेवा देण्यासाठीही आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे विभाग नियंत्रक प्र. सि. रसाळ यांनी दिली आहे.

जिल्ह्यातून अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी सज्ज

author img

By

Published : May 15, 2020, 12:18 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात अथवा राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्ह्यातील सातही आगारातील एसटी कर्मचारी आणि बस सज्ज आहेत. आमच्याकडे ग्रुप यादी आल्यावर या प्रवाशांना तत्काळ त्यांच्या गावी नेऊन सोडले जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे विभाग नियंत्रक प्र. सि. रसाळ यांनी दिली आहे.

प्र. सि. रसाळ, एसटी विभाग नियंत्रक, सिंधुदुर्ग

ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्याच्या राज्य सीमेवर दाखल होणारे जिल्ह्यातील नागरिक आणि राज्याच्या सीमेवर सोडावे लागणारे नागरिक यांच्यासाठी मोफत सेवा देण्यासाठीही आम्ही सज्ज आहोत. शिवाय जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी जे प्रवासी आणि मजूर इच्छुक आहेत, त्यांना 44 रुपये किलोमीटर दराने बस देण्यासाठीही आम्ही तयार आहोत.

जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून ग्रुप याद्या आल्यानंतर या प्रवाशांना सोडले जाईल, असेही ते म्हणाले. तसेच शासनाच्या अटी व शर्थींना अधीन राहून सर्व परवानग्या घेऊन जे प्रवासी आमच्याकडे येतील आणि बसची मागणी करतील त्यांना बससेवा दिली जाईल, असे रसाळ यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सावंतवाडी येथून नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन उत्तर प्रदेश येथे गेलेली आपली बस यशस्वी प्रवास करून परत आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील आपल्या बस स्थानकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.