सिंधुदुर्ग - कणकवलीमध्ये जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. १९ मार्चला मंगळुर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णांशी संपर्क आल्याने या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
या कोरोना बाधिताला सध्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जनतेने घाबरून जाऊ नये, स्वतः बरोबरच कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच करता येऊ शकतो डीअॅक्टिव्ह!
मंगळुर एक्स्प्रेसमधील अन्य सहा जणांच्या संपर्कात आलेल्या २२ जणांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातील एकच जण कोरोना बाधित आहे इतर २१ जण सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.