ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा दरदिवशी घेतला जातोय आढावा - पोलीस अधीक्षक गेडाम - corona update

जिल्ह्यात कोरोनाचा एकमेव रुग्ण सापडला होता. तो कोरोनामुक्त झाला असून आता जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या बाजूला असलेले रत्नागिरी, कोल्हापूर, आणि कर्नाटक हे भाग कोरोना हॉटस्पॉट आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी जिल्ह्याबाहेरुन कोणीही जिल्ह्यात येऊ नये म्हणून, विशेष दक्षता घेतली आहे. तर, कार्यरत पोलिसांचीही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या दैनंदिनी कामकाजाची माहिती दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा दरदिवशी घेतला जातोय आढावा

author img

By

Published : Apr 21, 2020, 9:43 AM IST

Updated : Apr 21, 2020, 10:50 AM IST

सिंधुदुर्ग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेबाराशे पोलीस कर्मचारी सध्या प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असून दर दिवशी त्यांच्या आरोग्याचा आढावा घेतला जातो. तर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून पोलीस ठाण्यात ड्युटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा दरदिवशी घेतला जातोय आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा एकमेव रुग्ण सापडला होता. तो कोरोनामुक्त होऊन घरी परतला असून त्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या बाजूला असलेले रत्नागिरी, कोल्हापूर, आणि कर्नाटक हे भाग कोरोना हॉटस्पॉट आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी जिल्ह्याबाहेरुन कोणीही जिल्ह्यात येऊ नये म्हणून, विशेष दक्षता घेतली आहे. तर, कार्यरत पोलिसांचीही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या दैनंदिनी कामकाजाची माहिती दिली.

ते म्हणाले, 'अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांना ई-पास दिलेले आहेत. तर क्वारंटाईन केलेल्या रुग्णांवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवला जात आहे.' त्यांना ट्रॅक करण्यासाठी या सॉफ्टवेअरची आम्हाला चांगली मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटूंबियांचीही आम्ही माहिती घेत आहोत. कुटूंबियांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे का, याची माहिती घेत आहोत. कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटरायझर दिले जात असून, कोणत्याही कर्मचाऱ्याला सर्दी, ताप किंवा खोकला आढळून आल्यास त्याची तत्काळ तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले. शिवाय काही ठराविक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही याची काळजी घेण्यासाठी रोटेशनप्रमाणे ड्युटी दिली जात आहे. जे कर्मचारी एकाच जागी बसून कंटाळत आहेत त्यांचे कौन्सिलिंग केले जात असल्याचेही गेडाम यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Apr 21, 2020, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.