ETV Bharat / state

आता तरी रमेश गोवेकरांचा ठावठिकाणा सांगाल का? परशुराम उपरकरांचा सवाल - Parashuram Uparkar News

उपरकर पुढे म्हणाले, खासदार नारायण राणे यांनी दिशा सालीयान व सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येबाबत मातोश्रीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे राणेंना धडा शिकवण्यासाठी सध्याचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी आता तरी तोंड उघडतील का, असाही प्रश्‍न त्यांनी केला आहे.

परशुराम उपरकरांचा सवाल
परशुराम उपरकरांचा सवाल
author img

By

Published : Aug 5, 2020, 9:32 PM IST

सिंधुदुर्ग - शिवसेनेत प्रवेश केलेले राणेसमर्थक २००५ सालात बेपत्ता झालेल्या रमेश गोवेकरांचे नेमके काय झाले, याचा तरी ठावठिकाणा सांगतील का, असा खोचक सवाल मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. दरम्यान बेपत्ता गोवेकर यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, यासाठी आपण सीबीआयच्या संचालकांना भेटलो. अनेक प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या राणे समर्थकांनी याचे उत्तर द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

२००५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राणेंसोबत असलेले परंतु, आज शिवसेनेत असलेले जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, छोटू पारकर, संग्राम प्रभुगावकर बाबा आंगणे, बाबा सावंत, बंडू चव्हाण, अरुण लाड आणि नुकताच प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कुडाळकर आता तरी बेपत्ता रमेश गोवेकरांचे काय झाले, हे जनतेला सांगतील का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, आपण विधानपरिषदेचे आमदार असताना सहा वर्षे प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून संबंधित गोवेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन भाई गोवेकरांसमवेत सीबीआयच्या संचालकांना भेटलो होतो. तरीपण रमेश गोवेकर यांचा पत्ता लागलेला नाही. मागील पाच वर्षात गृहराज्यमंत्री व सत्ता असूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे हा शोध लागावा यासाठी शिवसेनेत प्रवेश केलेली मंडळी तोंड उघडून माहिती देतील का, याची मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून वाट पाहत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.