ETV Bharat / state

... असा झाला सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त! - Corona Free

सिंधुदुर्ग हा कोरोनामुक्त झालेला कोकणातील एकमेव आणि पहिला जिल्हा आहे. जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभाग, पोलीस खाते आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून ही किमया साधता आली आहे. जिल्ह्यात असलेला एकमेव कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

Sindhudurg Corona Update
सिंधुदुर्ग कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 25, 2020, 8:01 AM IST

सिंधुदुर्ग - कोरोनामुक्त झालेला कोकणातील सिंधुदुर्ग हा एकमेव आणि पहिला जिल्हा आहे. जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभाग, पोलीस खाते आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून ही किमया साधता आली आहे. जिल्ह्यात असलेला एकमेव कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर सध्या 338 व्यक्ती क्वारंटाईन असून त्यापैकी 271 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात 67 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.

पुणे आणि मुंबई येथे नोकरीनिमित्त असलेल्या नागरिकांच्या गावी येण्याने कोरोनाचे संकट सिंधुदुर्गमध्ये वाढण्याची भीती जास्त होती. हे लक्षात घेऊन तत्काळ जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. परदेशी पर्यटकांना जिल्ह्यातून मागे पाठवण्यात आले. तरीही मुंबईहून आलेला एक रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे रिपोर्ट आले. तत्काळ या रुग्णावर उपचार सुरू करून प्रशासनाने या रुग्णाचे गाव आयसोलेट केले. प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि हा रूग्ण बरा होऊन घरी परतला.

माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम

जिल्हा कोरोनामुक्त करण्याच्या मोहिमेत पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सर्वात अगोदर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. जिल्ह्यात येणाऱ्या छुप्या वाटा शोधून त्याही बंद केल्या गेल्या. लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे यासाठी लोकांमध्ये जनजागृतीचेही काम केले. ज्यांच्याकडे योग्य पास आहे अशांनाच जिल्ह्यात घेतले आणि त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करवून घेतली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.

माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर

जिल्हा आरोग्य विभागाने प्रयत्न करुन कोरोनाच्या उपाययोजना राबवण्यात मोठी भूमिका निभावली. कोरोनाचे संकट घोंगावत असताना तत्काळ खबरदारीचे उपाय अमलात आणले गेले. डॉक्टर, नर्स यांना प्रशिक्षण देऊन या संकटाला तोंड देण्यासाठी तयार केले. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात सर्दी, ताप अशी लक्षणे दिसणाऱ्या लोकांचे विलगीकरण करण्यात आले. गावागावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून लोकजागृती केली. जे रुग्ण संशयित वाटले त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या 338 व्यक्ती क्वॉरेंटाईन

जिल्ह्यात सध्या 338 व्यक्ती क्वॉरेंटाईन असून त्यापैकी 271 व्यक्तींना घरीच क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात 67 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मिरज येथे 228 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 209 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 19 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षात सध्या 62 रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत शुक्रवारी 2 हजार 277 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआचे 10, डायलेसिसचे 42 व केमो थेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहेत. जिल्ह्यातील निवारा केंद्रातील 264 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे सामुपदेशन करण्यात आले.

कोरोनासंबधित आकडेवारी -

1) घरीच अलगीकरण करण्यात आलेले - 271

2) संस्थात्मक अलगीकरणात असलेले - 67

3) पाठविण्यात आलेले एकूण नमुने - 228

4) अहवाल प्राप्त झालेले नमुने - 209

5) आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने - 1

6) निगेटीव्ह आलेले नमुने - 208

7) अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 19

8) विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - 62
9) सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण - 00
10) शुक्रवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 2277

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.