ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५% मतदान होण्यासाठी प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी

author img

By

Published : Sep 24, 2019, 8:45 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी या निवडणूकीत मतदानाचा टक्का ७५ पर्यंत जावा यासाठी प्रयत्न करनार असल्याचे म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय

सिंधुदुर्ग - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. जिल्हा मुख्यालयात विधानसभा निवडणूक संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विधानसभेसाठी २००९ मध्ये ६७.५२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ६८.१३ टक्के मतदान झाले होते. ही निवडणुकीची गतवर्षीची टक्केवारी लक्षात घेता. यावेळी ७० ते ७५ टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती रॅली, विद्यालय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबरला त्या-त्या तालुक्यात मतमोजणी होणार आहे. कुडाळची मतमोजणी तहसीलदार कार्यालया नजीकच्या महिला हॉस्पिटल सभागृहात होणार आहे. कणकवलीची विद्यामंदिर तर सावंतवाडीची मतमोजणी नवीन तहसीलदार कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ६९ हजार ६६५ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ३३ हजार २९८ पुरुष मतदार तर ३ लाख ३६ हजार ३६७ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मूळ ९१५ मतदान केंद्रे आहेत. त्यात एक मतदान केंद्र अतिरिक्त केले असून एकूण ९१६ मतदान केंद्र असणार आहेत. अतिरिक्त केलेले मतदान केंद्र हे अरुणा प्रकल्पग्रस्तांसाठी असून ते आखवणे, गुरववाडी येथे असणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. दिव्यांगांसाठी ने आन करण्यासाठी विशेष सोय केली जाणार आहे.

काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली असल्याने विधानसभेसाठी देखील जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नाके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बारा भरारी पथके आणि तीन व्हिडिओ पथके कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. एकूण ७ हजार ९३६ कर्मचारी असून त्यातील ४ हजार १७४ कर्मचारी निवडणूक कामासाठी घेण्यात येणार असल्याचे पांढरपट्टे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी चौकशी करायची असल्यास १९५० हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. विविध परवानग्यांसाठी प्रांत कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. लोकसभे प्रमाणे विधान सभेतही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या ठिकाणी प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र ठेवण्यात येणार असून त्या मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचारी असणार आहेत. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी संजय घोडके, सहाय्यक माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, गौरव आरोसकर, वृंदा पाटकर आदी उपस्थित होते.

Intro:ओरोस: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७५ टक्के मतदान करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. जिल्हा मुख्यालयात विधानसभा निवडणूक संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा माहिती अधिकारी संजय घोडके, सहाय्यक माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, गौरव आरोसकर, वृंदा पाटकर आदी उपस्थित होते. Body:विधानसभेसाठी २००९ मध्ये ६७.५२ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ६८.१३ टक्के मतदान झाले होते. ही निवडणुकीची गतवर्षीची टक्केवारी लक्षात घेता. यावेळी ७० ते ७५ टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासाठी मतदान जनजागृती रॅली तसेच विद्यालय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला त्या त्या तालुक्यात मतमोजणी होणार आहे. कुडाळची मतमोजणी तहसीलदार कार्यालय नजीकच्या महिला हॉस्पिटल सभागृहात होणार आहे. कणकवलीची विद्यामंदिर तर सावंतवाडीची मतमोजणी नवीन तहसीलदार कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ६९ हजार ६६५ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ३३ हजार २९८ पुरुष मतदार तर ३ लाख ३६ हजार ३६७ महिला मतदार असून जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मूळ ९१५ मतदान केंद्रे आहेत. त्यात एक मतदान केंद्र अतिरिक्त केले असून एकूण ९१६ मतदान केंद्र असणार आहेत. अतिरिक्त केलेले मतदान केंद्र हे अरुणा प्रकल्पग्रस्तांसाठी असून ते आखवणे, गुरववाडी येथे असणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. दिव्यांगांसाठी ने आन करण्यासाठी विशेष सोय केली जाणार आहे. Conclusion:काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली असल्याने विधानसभेसाठी देखील जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. तसेच कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० नाके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. बारा भरारी पथके आणि तीन व्हिडिओ पथके कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. एकूण ७ हजार ९३६ कर्मचारी असून त्यातील ४ हजार १७४ कर्मचारी निवडणूक कामासाठी घेण्यात येणार असल्याचे पांढरपट्टे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी चौकशी करायची असल्यास १९५० हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. विविध परवानग्यांसाठी प्रांत कार्यालयात एक खिडकी कार्यान्वित करण्यात आली आहे. लोकसभे प्रमाणे विधान सभेतही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या ठिकाणी प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र ठेवण्यात येणार असून त्या मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचारी असणार आहेत. जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.