सिंधुदुर्ग (कणकवली) - नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी 'अभियंता प्रकाश शेडेकर' यांच्यावर चिखलफेक केल्यानंतर राज्यभरात या प्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. 'राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेने' याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला होता. यामुळे चंद्रकांत पाटलांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या घरी भेट दिली होती.
मात्र, चंद्रकांत पाटील यांची ही तत्परता सिंधुदुर्ग भाजपला रुचलेली दिसत नाही. सिंधुदुर्ग भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहीले असून, पत्रातून त्यांची नाराजी दिसून येते. "महामार्गाच्या दुरावस्थेची आधी पाहणी करा व शेडेकर यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दाखवलेली तत्परता येथेही दाखवावी" असा सल्ला देत एक प्रकारे नितेश राणेंच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.