सिंधुदुर्ग - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनाच क्वारंटाईन करा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त असताना मुंबईसारख्या कोरोनाच्या हाॅसस्पाॅट असलेल्या ठिकाणावरून येऊन विनायक राऊत हे जिल्ह्यात भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांचा लवाजमा व 15-20 गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. त्यामुळे जिल्हा वासियांसाठी एक न्याय आणि खासदारासाठी वेगळा न्याय का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
खासदारांनी 5 दिवसतरी होम क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, खासदार बिनधास्तपणे जिल्ह्यात फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना भीती वाटायला लागली आहे, की खासदारामुळेच जिल्ह्यात कोरोना पसरेल. त्यामुळे जिल्ह्याच्या जनतेने जी शिस्त पाळली ती आता का पाळावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदाराना राऊत यांना क्वारंटाईन होण्याची गरज असल्याची टीकाही, मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.