ETV Bharat / state

शिवसेनेच्या 'या' आमदाराला कोरोनाची लागण - MLA Vaibhav Naik news

सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. वैभव नाईक हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

ShivSena MLA Vaibhav Naik
शिवसेना आमदार वैभव नाईक
author img

By

Published : Jul 21, 2020, 12:30 AM IST

सिंधुदुर्ग - शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार वैभव नाईक यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - अयोध्या आणि शिवसेनेचे नाते राजकीय नाही- संजय राऊत

आज (सोमवार) सकाळी जिल्ह्यातील काही लोकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांचाही स्वॅब घेण्यात आला होता. आज सायंकाळी उशिरा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला होता. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. विशेषतः पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वैभव नाईक हे दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही चांगलीच हादरली आहे. दरम्यान, आमदार नाईक हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती सिव्हिल सर्जन डाॅक्टर धनंजय चाकोरकर यांनी माध्यमांना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.