ETV Bharat / state

पंकजा मुंडेंना राजकारणातून बाहेर टाकण्याचे काम भाजपाने केले - विनायक राऊत - ncp

ओबीसी समाज आणि ऊसतोड कामगार वर्गाचा आधारवड असलेल्या पंकजा मुंडे यांना राजकारणातून बाहेर टाकण्याचे काम भाजपाने केले आहे, असा आरोप शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

भाजपाने केलं
भाजपाने केलं
author img

By

Published : Jul 9, 2021, 8:24 PM IST

सिंधुदुर्ग - ओबीसी समाज आणि ऊसतोड कामगार वर्गाचा आधारवड असलेल्या पंकजा मुंडे यांना राजकारणातून बाहेर टाकण्याचे काम भाजपाने केले आहे, असा आरोप शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मागच्या सरकारच्या काळात फडणवीस यांनी आधी पंकजा यांचे पंख छाटले, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

'पंकजा मुंडेंना राजकारणातून बाहेर टाकण्याचे काम भाजपाने केले'

'मुंडे-खडसेंना फडणवीस यांनी राजकारणातून बाद केले'
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे कुटुंबीयांकडे पहिले जात होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सरकारच्या काळात पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना बाद करून टाकले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

'नारायण राणे मंत्री असताना त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला'
नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री म्हणून लागलेली वर्णी आणि शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपचा डाव याबाबतही खासदार राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिले असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना सुद्धा त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असे सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.

'भारती पवार या उच्चशिक्षित आणि हुशार आहेत'
मंत्री भारती पवार या लोकसभेत मराठीत बोलत असताना मागे प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोघीही हसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले आपल्या मातृभाषेतही लोकसभेत आपण बोलू शकतो. तशी परवानगी मिळते आणि मंत्री भारती पवार या उच्चशिक्षित आणि हुशार आहेत. त्या चांगल्या अभ्यासूही आहेत, असेही यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले.

हेही वाचा - नारायण राणे हे दुधारी शस्त्र, मंत्रिपद मिळाल्याने आक्रमक स्वभावाची अडचण होणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.