ETV Bharat / state

कणकवली हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा; शिवसेना आमदार वैभव नाईक यांची मागणी - वैभव नाईक कणकवली पोलीस ठाणे भेट

आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा, अशी मागणी करण्यात आली.

MLA Vaibhav Naik visit Kankavli Police Station
नितेश राणे आणि वैभव नाईक
author img

By

Published : Dec 27, 2021, 8:00 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा बँक निवडणुकीचे वातावरण आता जिल्ह्यात चांगलेच तापू लागले आहे. आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या खुनी हल्ल्यातील सुत्रधाराला अटक करा, अशी मागणी करण्यात आली. तर, जिल्हा बँकेचे मतदार असलेले प्रमोद वायंगणकर यांचा शोध घ्या, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदन देण्यात आले.

प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार वैभव नाईक

हेही वाचा - Narayan Rane on Nitesh Ranes arrest : नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत

यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर, भूषण परुळेकर, सचिन सावंत, कन्हैया पारकर, नीलम पालव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परब यांच्यावर कणकवलीत झाला होता हल्ला

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Compalaint Against Nitesh Rane ) यांचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशीसाठी हजर राहावे यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण (Shivsena vs Nitesh Rane) चांगलेच तापले आहे. शनिवार (दि. 18 डिसेंबर)रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.

अज्ञातांनी केला हल्ला

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले आहेत. संतोष परब Shivsena Activist Santosh Parab) यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Shivsena Activist file Compalaint Against Nitesh Rane) संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. त्यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकूने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत; सतीश सावंत यांचा आरोप

जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला. जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचेही सावंत म्हणाले आहेत. 2015 साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले होते.

राणे यांच्यावर सुडाच्या भावनेतून कारवाई - नारायण राणे

नितेश राणे यांच्यावर सुडाच्या भावनेतून कारवाई केली जात आहे. जिल्हा परिषद निवडणूक आपण हरणार आहोत, हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकारण सुरू केले आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सध्या सर्व सुडाच्या भावनेतून राजकारणातून अश्या बातम्या पेरल्या जात आहे. दरम्यान, नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असही राणे यावेळी म्हणाले आहेत. गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि अशा पद्धतीने सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावच लागले असही राणे म्हणाले आहेत.

नितेश राणेंकडून अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज

आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा उच्च न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी होणार होती. याबाबत उद्या 28 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. रावराणे यांनी दिली आहे.

आयपीसी 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जमीन जिल्हा न्यायालयात मंजूर होणार की, त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार, हे चित्र उद्या 28 डिसेंम्बर रोजी स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - MLA Nitesh Rane Alleges on Government : संतोष परब हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न - आमदार राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.