ETV Bharat / state

निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात - शिवसेना आमदार वैभव नाईक - शिवराजेश्वर मंदिर शिवजयंती सोहळा

शिवजयंतीच्या निमित्ताने आज आमदार वैभव नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी किल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले.

MLA Vaibhav Naik
आमदार वैभव नाईक
author img

By

Published : Feb 19, 2021, 3:02 PM IST

Updated : Feb 19, 2021, 4:07 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवण किल्ल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. किल्ल्यातील पाणी योजनेसाठी 5 कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दीड कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिल्याची माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली. तर, निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - रायगडावर मद्य पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना दिला बेदम चोप

किल्याच्या डागडुजीचे काम करणार

शिवजयंतीच्या निमित्ताने आज आमदार वैभव नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी किल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगितले.

शिवसेना आमदार वैभव नाईक

हेही वाचा - भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी दोन परिचारिकांवर गुन्हा दाखल

निलेश राणे स्टंटबाजी करतात

माजी खासदार निलेश राणे हे केवळ स्टंटबाजी करतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. निलेश राणे यांनी हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, मी मालवण किल्ल्यावर येतोय, असे आव्हान दिले होते. त्यावर ते बोलत होते.

किल्ल्यातील नळ योजनेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद

किल्ल्यातील नळ योजनेसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शिवराजेश्वर मंदिरासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवराजेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. तर लवकरच नळ योजना पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदीरात शिवाजी महाराजांना जिरेटोप अर्पण केली. यावेळी ढोलताशांचा गजर आणि महाराजांच्या जयघोषाने सिंधुदुर्ग किल्ला दुमदुमून गेला होता. राज्यशासनाने मनाई आदेश जारी केला असून कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आपण शिवजयंती साजरी करत असल्याचं यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 19, 2021, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.