सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी ( Santosh Parab Attack Case ) गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी राकेश परब सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याला आज कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने राकेश परब याला 4 फेब्रुवारी पर्यत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Rakesh Parab Police Custody ) आहे. पोलिसांनी मात्र, 14 दिवसांची कोठडी मागण्यात आली होता.
हे काम करायला पाहिजे होते
न्यायालयाला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आलेली. फेस टाईम अॅप वरुन मुख्य संशयित सचिन सातपुते सोबत राकेश परब हा फोन करुन "हे काम करायला कशाला पाहिजे होते," असा संवाद झालेला. त्यामुळे त्यांचे फोन जप्त करुन पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्याला वेळ आवश्यक असल्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. त्यासाठी सचिन सातपुते आणि राकेश परब यांनी पुणे आणि कोल्हापूरात हा कट रचला, त्याचा तपास करण्यासाठी 14 दिवसांची कोठडी पोलिसांकडून मागण्यात आली. मात्र, राकेश परब यांचे वकील अॅड. उमेश सावंत यांनी हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून, राकेश परब हे काल स्वत:हून कणकवली पोलिसांत हजर झाले. तसेच, पोलिसांनी ही बाब निदर्शनास आणून न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद केला. या गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यासारखी काही बाब राहिली नाही, असा युक्तीवाद करत 14 दिवसांच्या कोठडीला विरोध केला. न्यायालयाने 14 दिवसांची मागणी फेटाळत तीन दिवसांची कोठडी सुनावली.
राकेश परब यांचे 38 कॉल आढळले होते
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर 2021 रोजी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय सचिन सातपुते याला अटक करण्यात आली होता. सचिन सातपुतेचे राकेश परब सोबत 38 कॉल आढळले होते. या पार्श्वभूमीवर सचिन सातपुते सोबत राकेश परब याला सहआरोपी म्हणून समावेश केला. राकेश परब हा घटना घडल्यानंतर फरारी होता. त्याचा कणकवली पोलीस शोध घेत होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश परब याने धाव घेतली होती, मात्र जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, सोमवारी राकेश परब कणकवली पोलिसांसमोर हजर झाला.
हेही वाचा - Schools Reopen In Pune : पुण्यात आजपासून पहिली ते दहावीच्या शाळा सुरू; विद्यार्थी म्हणाले...