सिंधुदुर्ग - संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात ( Santosh Parab Attack Case ) सर्वोच्च न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ( Supreme Court On Nitesh Rane ) होता. त्यानंतर शुक्रवारी नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरण येत जामीनासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार असून यावेळी नितेश राणे यांना अटक होते की दिलासा मिळतो हे ठरणार आहे.
ख्यातनाम वकील जिल्ह्यात हजर
नितेश राणेंच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी मुंबईतील ख्यातनाम वकील सतीश मानशिंदे ( Advocate Satish Mane shinde ) सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. जिल्हा न्यायालयात त्यासोबत ऍड. संग्राम देसाई, ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. उमेश सावंत, ऍड. राजेश परुळेकर युक्तिवाद करणार आहेत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर ( Nitesh Rane Bail Hearing Sindhudurg ) झाले. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज नितेश राणेंना अटक होणार की नाही? याबाबात चित्र स्पष्ट होणार आहे.
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यावरुन पोलिसांनी सुत्रे हलवत मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला अटक केली. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा - Jitendra Avhad On Up election 2022 : "... तर भाजपाला पूर्ण मातीत घाला," जितेंद्र आव्हाड यांची टिका