ETV Bharat / state

...तर रस्त्यावर उतरुन महामार्गाचे काम बंद पाडू, ठेकेदारांना नगराध्यक्षांचा इशारा - मुंबई गोवा लेटेस्ट न्यूज

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. ठिकठिकाणच्या संरक्षक भिंती खचल्या आहेत. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्‍यात आला तर आम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.

Repair Mumbai-Goa highway soon, demand Sameer Nalawade in sindhudurg
नगराध्यक्ष समीर नलावडे
author img

By

Published : Jun 24, 2020, 4:32 PM IST

Updated : Jun 24, 2020, 4:56 PM IST

सिंधुदुर्ग - महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. ठिकठिकाणच्या संरक्षक भिंती खचल्या आहेत. महामार्गाला तडे जाण्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे धोकादायक महामार्गाची तातडीने दुरूस्ती व्हायला हवी. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्‍यात आला तर आम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात नगरसेवक, महामार्ग ठेकेदार प्रतिनिधी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्‍त बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, अजय गांगण, दिलीप बिल्डकॉनचे राजवर्धन परिहार, उदयसिंग चौधरी आदी उपस्थित होते.

...तर रस्त्यावर उतरुन महामार्गाचे काम बंद पाडू, ठेकेदारांना नगराध्यक्षांचा इशारा
या बैठकीत नगरसेवकांसह नागरिकांनी शहरातील एस. एम. हायस्कूल ते गांगोमंदिर या दरम्यान धोकादायक झालेली महामार्गाची भिंत, बंद असलेल्या स्ट्रीट लाइट, जलमय होणारे सर्व्हिस रोड, गटारांची अपूर्ण कामे, संरक्षक भिंत नसल्याने वारंवार खचत जात असलेला महामार्ग आदी समस्या मांडण्यात आल्या. या सर्व समस्या येत्या आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही ठेकेदार प्रतिनिधी राजवर्धन परिहार यांनी दिली. तर आठ दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरतील असा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला.

Last Updated : Jun 24, 2020, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.