ETV Bharat / state

सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा शुभारंभ - सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग येथे कार्यान्वित झालेले कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग तर पुढे रत्नागिरी जिल्ह्याचा या बटालियनमध्ये समावेश केला जाणार आहे.

संबंधित छायाचित्र
author img

By

Published : Mar 2, 2019, 10:03 AM IST

सिंधुदुर्ग - राष्ट्रीय छात्र सेनेच्या ५८ महाराष्ट्र बटालीयनचा शुक्रवारी दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेचे अतिरिक्त महासंचालक गजेंद्र प्रसाद यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने बटालियनचा शुभारंभ करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ

राष्ट्रीय छात्र सेनेच्या रूपाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, ब्रिगेडीयर आर. बी. डोंगरा, कर्नल देवेन भारद्वाज, लेफ्टनंट कर्नल सी.पी. उन्नीकृष्णन आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय छात्र सेना स्थापन करण्यात आली आहे. ही भारताच्या संरक्षण व्यवस्थेची तिसरी महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. सिंधुदुर्ग येथे कार्यान्वित झालेले कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग तर पुढे रत्नागिरी जिल्ह्याचा या बटालियनमध्ये समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे ३ हजार ५०० एवढी या नव्या बटालियनची क्षमता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन असंख्य विद्यार्थ्यांना या बटालियनचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा संकुलाच्या बाजूस असलेल्या इमारतीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

Intro:५८ महाराष्ट्र बटालीयनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय छात्र सेनेचा शुक्रवारी दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ झाला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेचे अतिरिक्त महासंचालक गजेंद्र प्रसाद यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने बटालियनचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या रूपाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजूलक्ष्मी, ब्रिगेडीयर आर.बी. डोंगरा, कर्नल देवेन भारद्वाज, लेफ्टनंट कर्नल सी.पी. उन्नीकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.Body:भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय छात्र सेना स्थापन करण्यात आली आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेची तिसरी महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. सिंधुदुर्ग येथे कार्यान्वित झालेले कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग तर पुढे रत्नागिरी जिल्ह्याचा ही या बटालियन मध्ये समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे ३५०० एवढी या नव्या बटालियनची क्षमता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन असंख्य विद्यार्थ्यांना या बटालियनचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
Conclusion:सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा संकुलाचे बाजूस असलेल्या इमारतीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी कर्नल देवेन भारद्वाज यांनी प्रास्ताविक केले. शेवटी राष्ट्रीय छात्र सेनेचे हम सब भारतीय है या गीताने समारंभाचा समारोप झाला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.