सिंधुदुर्ग - जैवविधता टिकवण्याच मोठं आव्हान पेलवणाऱ्या सिंधुदुर्गात पहिला जैविक कोळसा निर्मितीचा कारखाना उभा राहिलाय. संपूर्णपणे टाकावू वस्तूपासून हा कोळसा बनवला जातोय. विशेष म्हणजे या कारखान्यात शंभर टक्के महिला कर्मचारी काम करताहेत. कोकणात आदर्शवत ठरू पाहणाऱ्या या कारखान्याची निर्मिती सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील कडावल गावातल्या महिलांच्या फायद्याची ठरली आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना गावातचं रोजगार देणारा कोकणातील हा पहीलाच प्रकल्प आहे.
रानमोडीच्या संकटातूनही कोकणवासीयांची होणार मुक्तता
कोकण म्हणजे हिरवीगार निसर्गसंपदा.. इथल्या माडा फोफळीच्या बागा इथला निसर्ग हे सर्व भुरळ घालतं. मात्र इथला हा निसर्ग अलीकडे जंगल तोडीमुळे धोक्यात आलाय. जळाऊ लाकूड म्हणून कोकणात मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत आहे. मात्र हे सर्व थांबवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुविकास इंडस्ट्रीयल को आपरेटिव्ह संस्थेने पुढाकार घेतलाय. किरण गावकर आणि ज्योती गावकर यांच्या पुढाकाराने ही संस्था उभी राहिलीय. जंगल नष्ट करणारी रानमोडी ही वनस्पती, जंगलातील वेस्टेज, कोंबड्याची शिट, आणि सुक्या लाकडांचा भुसा यापासून इथे ब्रिकेट्स बनविले जात आहेत. हे ब्रिकेट्स जळणासाठी वापरले जातात. तसेच औषध कंपन्या व इतर प्रकारच जळण यासाठी हा जैविक कोळशाचा वापर केला जातो. खरतर कोकणातील जंगली रानमोडी ही त्रासदायक असते. माञ याचं रानमोडीचा वापर कोळसा बनवण्यासाठी होत असल्याने रानमोडीच्या संकटातूनही कोकणवासीयांची मुक्तता होणार आहे, असे यावेळी किरण गावकर यांनी सांगितले.
महिलांना गावातच मिळाला रोजगार
येथील महिलांच्या हाताला गावातचं काम मिळावं या उद्देशाने किरण गावकर यांनी उभा केलेला उद्योग निश्चितच कोकणातील तरुणांना प्रेरणादायी आहे. या प्रकल्पाच वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पात सर्व महिला काम करत आहेत. अगदी ऑपरेटर पासून ते इतर सर्व काम महिला करत आहेत. सध्या लोकडाऊनमध्ये अनेक हातांना कामs नाहीत. अनेक जण बेकार झाले आहेत. मात्र या संस्थेने अगदी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिलाय, त्यामुळे आमच्या कुटुंबाला मोठा आर्थिक हातभार लागला., असे यावेळी महिला कर्मचारी सोनिया आणि गायत्री यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 100 महिला काम करत आहेत.
जैविक कोळशाच्या उपलब्धतेमुळे जंगल तोड कमी होईल
सिंधुदुर्गातील या महत्वाकांक्षी प्रकल्पाच उदघाटन नवीन वर्षात झालंय. कोकणात खरंतर मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते ती सरपण म्हणून. मात्र आता जैविक कोळशाच्या उपलब्धतेमुळे जंगल तोड कमी होईल त्यामुळे सिंधुविकास संस्थेचा हा प्रकल्प पर्यावरण पूरक तर ठरणार आहेच शिवाय या प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीसाठीही पोषक ठरणार आहे. आणि म्हणूनच हा प्रकल्प पर्यावरण पूरक असल्याने कोकण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.
हेही वाचा - 'नाणार प्रकल्प कोकणातून गेल्यास मोठे नुकसान'